गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठे गिफ्ट

Edited by Harshada J S Image credit: Canva

राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणपती आगमन-विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Image credit: CMO Maharashtra

कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावे, असेही निर्देश CM शिंदेंनी दिलेत.

Image credit: Canva

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. 

Image credit: CMO Maharashtra

गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी - CM शिंदे 

Image credit: Canva

गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

Image credit: CMO Maharashtra

महापालिकांनी गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्निशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये - CM शिंदे 

Image credit: Canva

सह्याद्री अतिथीगृहावर गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक झाली. त्यावेळेस हे निर्णय घेण्यात आले आहेत.

Image credit: CMO Maharashtra

आणखी वाचा

मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध-CM शिंदे

marathi.ndtv.com