महिनाभर ही काळी गोष्ट भिजवून खा, केस-त्वचा होईल सुंदर आणि वजनही घटेल 

Edited by Harshada J S Image credit: Sharvari Wagh Instagram
Image credit: Canva

काळे मनुके आरोग्यासाठी फायदेशीर असतात, विशेषतः हे पाण्यात भिजवून खाल्ल्यास शरीरास अधिक लाभ मिळतात. 

Image credit: Canva

महिनाभर तुम्ही भिजवलेले काळे मनुके खाल्ल्यास शरीरामध्ये काय बदल होतात? जाणून घेऊया सविस्तर...

Image credit: Canva

भिजवलेले काळे मनुके खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अ‍ॅनिमियाग्रस्त रुग्ण किंवा शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या लोकांनी नियमित भिजवलेल्या मनुक्यांचे सेवन करावे.

Image credit: Canva

मनुक्यांमुळे त्वचेशी संबंधित समस्या देखील कमी होतात, यातील पोषकघटकांमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

Image credit: Canva

मनुक्यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळते, जे हृदयासाठी फायदेशीर आहे. 

Image credit: Canva

मनुक्यांमध्ये कॅल्शिअम आणि बोरॉन असते, ज्यामुळे हाडे मजबूत असतात. हाडांशी संबंधित आजार कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मनुक्यामध्ये नैसर्गिक साखर म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा मोठा साठा आहे. ज्यामुळे शरीरास ऊर्जा मिळते. 

Image credit: Canva

मनुक्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोषकतत्त्व मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात, ज्यामुळे मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत सुरू राहते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

Coconut Water Benefits: 15 दिवस नारळाचे पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com