सकाळी रिकाम्या पोटी
चहा पिण्याचे तोटे

Image credit: Canva Edited by Harshada J S

भारतामध्ये चहा हे केवळ एक पेय नाही, तर लोकांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. बहुतांश जणांना सकाळी उठल्यानंतर लगेचच गरमागरम चहा पिणे आवडते. 

Image credit: Canva

तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता का? तर मग वेळीच ही सवय सोडा. कारण रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नसते.

Image credit: Canva

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास अ‍ॅसिडिटी होऊ शकते. यामुळे पोटात जळजळ होणे व अपचनाच्या समस्या निर्माण होतील.

Image credit: Canva

निद्रानाशाची समस्या असल्यास रात्रीच्या वेळेस चहा पिणे टाळावे. चहातील कॅफीनमुळे झोपेवर दुष्परिणाम होतात.

Image credit: Canva

शरीरात लोहाची कमतरता असल्यास रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे. चहामध्ये टॅनिन्सचे घटक असतात, ज्यामुळे शरीरातील लोहाच्या पातळीवर परिणाम होऊ शकतात. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास दात खराब होऊ शकतात. चहामध्ये टॅनिक अ‍ॅसिड असते, ज्यामुळे दात पिवळे होतात. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास मूड स्विंग होतात आणि थकवा जाणवू शकतो. अशक्तपणा जाणवत असल्यास चहा पिणे टाळावे.

Image credit: Canva

 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

बनावट केसर कधी ओळखाल? जाणून घ्या 5 पद्धती 

marathi.ndtv.com