दुधामध्ये हा काळा पदार्थ भिजवून खाल्ल्यास मिळतील मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva
15/06/2024

काळे मनुके दुधामध्ये भिजवून खाल्ल्यास शरीरास पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. 

15/06/2024 Image credit: Canva

मनुके व दुधामध्ये कित्येक पोषकघटकांचा समावेश असतो. मनुके पाण्यात भिजवून खाणे फायदेशीर असते. पण दुधासह मनुके खाल्ल्यास आरोग्यास दुप्पट फायदे मिळतात. 

15/06/2024 Image credit: Canva

मनुक्यांमुळे त्वचा निरोगी राहते. यातील अँटी-ऑक्सिडेंट्समुळे वाढत्या वयाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. शिवाय यामध्ये अँटी फंगल व अँटी बॅक्टेरिअल गुणधर्मही आहेत. 

15/06/2024 Image credit: Canva

मनुक्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. यातील फायबरमुळे बद्धकोष्ठता व अपचनाची समस्या दूर होते. 

15/06/2024 Image credit: Canva

मनुके खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची समस्या दूर होते. शरीरात लोहाची कमतरता असणाऱ्यांनी मनुक्यांचे सेवन करावे. 

15/06/2024 Image credit: Canva

मनुक्यातील पोषकघटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दुधामध्ये मनुके भिजवून खाल्ल्यास मोठे लाभ मिळतील. 

15/06/2024 Image credit: Canva

मनुके खाल्ल्यास शरीराला ऊर्जेचा पुरवठा होतो. यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, फायबर, कॅल्शिअम, झिंक, कॉपर हे गुणधर्म आहेत.

15/06/2024 Image credit: Canva

NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

15/06/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

 नारळ पाणी प्यायल्यास या लोकांना होऊ शकतो गंभीर त्रास

marathi.ndtv.com