बेलीफॅट घटवण्यासाठी या 5 आसनांचा करा सराव 

Edited by  Harshada J S Image credit: Canva
02/04/2024

शरीर सडपातळ, सुंदर व निरोगी असावे, यासाठी फिटनेसफ्रीक मंडळी बरीच मेहनत घेतात.

02/04/2024 Image credit: Canva

काही जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करतात तर काही जण योगासनांचा सराव करून सुडौल शरीरयष्टी कमावतात.

02/04/2024 Image credit: Canva

आसनांमुळे शारीरिक-मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. नियमित सराव केल्यास बेलीफॅट घटण्यास मदत मिळू शकते.

02/04/2024 Image credit: Canva

बेलीफॅट घटवण्यासाठी धनुरासन हे एक प्रभावी आसन आहे. यामुळे पोट-ओटीपोटाच्या स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे फॅट्स घटण्यास मदत मिळते.

02/04/2024 Image credit: Canva

उत्कटासनाच्या सरावामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते. यामुळे फॅट्स मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळते.   

02/04/2024 Image credit: Canva

वीरभद्रासनाच्या सरावामुळे पाय, हात, पाठ, पोट-ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात. स्नायूंची क्षमता सुधारल्याने  कॅलरीज्-फॅट्स घटण्यास मदत मिळते. 

02/04/2024 Image credit: Canva

भुजंगासनाच्या सरावामुळे शरीराचे पोश्चर सुधारते. पोट-पाठ,हाताचे स्नायू मजबूत होतात व पोट-ओटीपोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. 

02/04/2024 Image credit: Canva

सेतूबंधासनाच्या सरावामुळेही शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते. तसेच पोट-ओटीपोटाच्या भागातील अवयवांचे आरोग्यही निरोगी राहते.

02/04/2024 Image credit: Canva

शारीरिक दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच आसनांचा सराव करावा.

02/04/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

02/04/2024 Image credit: Canva


20 दिवसांचा दुरावा, नयनतारा झाली भावुक

आणखी वाचा

marathi.ndtv.com