Shubhanshu Shukla Photos: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पृथ्वीवर वापसी
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळातून पृथ्वीवर परतले आहेत.
Image credit: PTI आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) 18 दिवसांचे वास्तव्य केल्यानंतर त्यांचे ड्रॅगन यान पृथ्वीवर परतलंय.
Image credit: PTI शुभांशू शुक्ला यांनी अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत अंतराळातील त्यांचा पहिला प्रवास पूर्ण केला.
Image credit: PTI शुभांशू शुक्ला ॲक्सिओम-4 (Axiom-4) मोहिमेतील अन्य तीन अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले आहेत.
Image credit: PTI अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या समुद्रात शुक्ला यांचे यान उतरले.
Image credit: PTI भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत.
Image credit: PTI 150 अब्ज डॉलर किमतीच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकास भेट देणारे ते पहिले भारतीय आहेत.
Image credit: PTI 10 ऑक्टोबर 1985 रोजी जन्मलेले शुक्ला लखनौमधील मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये लहानचे मोठे झाले.
Image credit: PTI शुक्ला कुटुंबाचा हवाई क्षेत्र किंवा अंतराळ क्षेत्राशी थेट संबंध नव्हता.
Image credit: PTI लहानपणी पाहिलेल्या एअर शोमुळे अवकाशामध्ये झेपावण्याचे स्वप्न शुभांशू शुक्ला यांना पडू लागली आणि ते स्वप्न पूर्ण देखील झाले.
आणखी वाचा
108 हेल्पलाइन नंबरचे काही गांभीर्य आहे की नाही? रीचार्ज, दारूसाठी लोक करतात फोन
marathi.ndtv.com