समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण, कोणाला होणार फायदा?

Edited by Harshada J S Image credit: DCM Eknath Shinde Insta
Image credit: DCM Eknath Shinde Insta

समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण 5 जून 2025 रोजी करण्यात आले. 

Image credit: DCM Eknath Shinde Insta

राज्याच्या 5 महसूल विभागाच्या 10 जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधील 392 गावातून जाणारा हा सहापदरी महामार्ग ग्रीन फिल्ड संरेखन आहे. 

Image credit: DCM Eknath Shinde Insta

समृद्धी महामार्गामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक ठाणे हे 10 जिल्हे प्रत्यक्षरित्या जोडले गेले आहेत. 

Image credit: DCM Eknath Shinde Insta

चंद्रपूर,गोंदिया,भंडारा,गडचिरोली,यवतमाळ, अकोला,हिंगोली,परभणी,नांदेड,बीड,धुळे, जळगाव,पालघर,रायगड हे 14 जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडले गेले आहेत.

Image credit: DCM Eknath Shinde Insta

जुन्या नागपूर मुंबई मार्गावरुन नागपूरहून मुंबईकडे येण्यास 17-18 तास लागतात. 

Image credit: DCM Eknath Shinde Insta

नवीन 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'ने प्रवास आठ तासात करणे शक्य होणार आहे.

Image credit: Chandrakant Patil Insta

हा महामार्ग दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग,जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि शिर्डी, अजिंठा–वेरुळ लेणी,लोणार सरोवर आणि इतर पर्यटन स्थळांना जोडणारा आहे.

Image credit: Chandrakant Patil Insta

समृद्धी महामार्ग हा अभियांत्रिकी कौशल्यासह अनेक वैशिष्ट्यानींही समृद्ध असा महामार्ग आहे.

Image credit: Chandrakant Patil Insta

ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांनाही या महामार्गामुळे प्रवास जलदपणे करणे शक्य होणार आहे. 

Image credit: Chandrakant Patil Insta

शिर्डी, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर-इगतपुरीतील शेतकऱ्यांना शेतमाल कमी कालावधीत मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवता येणार आहे. 

Image credit: Chandrakant Patil Insta

CM फडणवीसांनी महामार्गावर निर्माण होणारी वीज 250 मेगाव्हेटवरून 1000 मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. 

Image credit: Chandrakant Patil Insta

अग्निसुरक्षेसाठी देशातील बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वात लांबीच्या बोगद्यात बसवण्यात आलीय. 

Image credit: Chandrakant Patil Insta

या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे. 

Image credit: MSRDC

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे.

आणखी वाचा

समृद्धी महामार्गाच्या या गोष्टी माहिती आहेत का?

marathi.ndtv.com