'अनुपमा' सावत्र मुलीवर संतापली, 50 कोटी रुपयांची पाठवली मानहानीची नोटीस

Edited by Harshada J S Image credit: Rupali Ganguly Insta

'अनुपमा' मालिका फेम अभिनेत्री रुपाली गांगुली गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 

Image credit: Rupali Ganguly Insta

रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्माने तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करत मुलाबाबतही आक्षेपार्ह विधान केले. 

Image credit: Rupali Ganguly Insta

मुलाबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर रुपालीने ईशा वर्माला कायदेशीर नोटीस धाडलीय. 

Image credit: Rupali Ganguly Insta

ईशाने चारित्र्य आणि खासगी आयुष्याबाबत बदनामी केल्याबद्दल रुपालीने 50 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवलीय.

Image credit: Rupali Ganguly Insta

वकील सना रईस खानच्या माध्यमातून रुपालीने ही नोटीस पाठवलीय. 

Image credit: Rupali Ganguly Insta

रुपालीला मानसिक त्रास झाला, ज्यामुळे तिला वैद्यकीय मदत घ्यावी लागली; असे नोटीसमध्ये म्हटले गेले आहे. 

Image credit: Rupali Ganguly Insta

सेटवर अपमान करण्यात आला आणि अनेक व्यावसायिक संधी गमावाव्या लागल्या,असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेय.

Image credit: Rupali Ganguly Insta

याबाबत मौन पाळायचे होते, पण या प्रकरणामध्ये 11 वर्षीय मुलाला ओढले गेले.  त्यामुळे मानहानीची नोटीस पाठवावी लागल्याचे अनुपमाने म्हटलंय.

Image credit: Rupali Ganguly Insta

तसेच ईशाने सार्वजनिकरित्या माफी मागण्याची मागणीही रुपालीने केलीय. असे न केल्यास कायदेशीर कारवाईचाही इशारा तिने दिलाय. 

Image credit: Rupali Ganguly Insta

आणखी वाचा

आमिर-अजय 27 वर्षांनंतर या सुपरहिट सिनेमाच्या सीक्वेलमध्ये दिसणार एकत्र?

marathi.ndtv.com