शाहरुख खानने त्याची ही इतकी वाईट सवय सोडली, कारण...

Edited by Harshada J S Image credit: Shah Rukh Khan Insta

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला एका गोष्टीचे अतिशय वाईट व्यसन होते. 

Image credit: Shah Rukh Khan Insta

अखेर या वाईट सवयीतून त्याची सुटका झाली आहे. 

Image credit: Shah Rukh Khan Insta

एकेकाळी मोठ्या प्रमाणात धुम्रपान करणाऱ्या शाहरुख खानने अखेर ही सवय सोडल्याचा खुलासा केला आहे.

Image credit: Shah Rukh Khan Insta

SRKने नुकतेच 59वा वाढदिवस साजरा केला, यावेळेस सेलिब्रेशनसाठी जमलेल्या चाहत्यांसह त्यांनी ही माहिती शेअर केली. 

Image credit: Shah Rukh Khan Insta

एका व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान त्याच्या धूम्रपानाच्या सवयीशी संबंधित माहिती देत असल्याचे दिसतंय.

Image credit: Shah Rukh Khan Insta

व्हिडीओमध्ये शाहरुख खानने म्हटलं की, मी आता धू्म्रपान करत नाही. 

Image credit: Shah Rukh Khan Insta

मला वाटायचं धूम्रपान सोडल्यानंतर श्वास घेताना त्रास होणार नाही, पण अजूनही याचे दुष्परिणाम जाणवतात - शाहरुख खान

Image credit: Shah Rukh Khan Insta

दरम्यान कमीत कमी पुढील 10 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करायचंय, असेही SRKने यावेळेस सांगितले. 

Image credit: Shah Rukh Khan Insta

वर्ष 2012मध्ये IPL मॅचदरम्यान सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याने SRKवर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली. 

Image credit: Shah Rukh Khan Insta

दुसरीकडे आपल्या मुलांसाठी मद्यपान-धूम्रपान सोडण्याचा विचार करत असल्याचेही SRKने 2017मध्ये एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. 

Image credit: Shah Rukh Khan Insta

आणखी वाचा

शालू-जब्या लग्नबंधनात अडकले? राजेश्वरी खरातने PHOTO केला शेअर

marathi.ndtv.com