Space Docking Experiment: उपग्रह योग्य कक्षेत स्थिरावले, इस्रोची नव्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
स्पेस डॉकिंग एक्सप्रिमेंटसाठी इस्रोने महत्त्वपूर्ण पाऊल टाकलंय. या प्रयोगासाठी दोन उपग्रह सोमवारी (30 डिसेंबर) प्रक्षेपण तळावरून झेपावले आहेत.
Image credit: PTI
Image credit: PTI
उपग्रह आपापल्या नियोजित कक्षेमध्ये स्थिरावल्याची माहिती समोर आलीय.
Image credit: PTI
इस्रोला या तंत्रज्ञानामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी मदत मिळेल.
Image credit: PTI
इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले की, प्रक्षेपणानंतर उपग्रह 15 मिनिटांनंतर जमिनीपासून 475 किलोमीटर उंचावरील नियोजित कक्षेमध्ये स्थिरावले.
Image credit: PTI
पुढे ते असंही म्हणाले की, स्पॅडेक्स उपग्रह एका मागोमाग एक असलेल्या नियोजित कक्षेत पोहोचले आहेत.
Image credit: PTI
उपग्रहांमधील अंतर 20 किलोमीटरवर आल्यानंतर त्यांच्या जोडणीची आणि डॉकिंगची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही सोमनाथांनी सांगितले.
Image credit: PTI
साधारणतः 7 जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Image credit: PTI
मिशनचा सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे PS4-ऑर्बिटल एक्सप्रिमेंट मॉड्युल (POEM-4).
Image credit: PTI
या मॉड्युलमध्ये स्टार्टअप्स, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि ISRO केंद्रांमधील 24 पेलोड्सचा समावेश आहे.
Image credit: PTI
इस्रोने 2035पर्यंत स्वतःचे स्पेस स्टेशन उभारण्यापूर्वी ही मोहीम एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Image credit: PTI
दरम्यान हा प्रयोग यशस्वी झाल्यास हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश असेल.
आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीनने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
Image credit: PTI
आणखी वाचा
Year Ender 2024 : रतन टाटा ते मनमोहन सिंग, 'या' दिग्गजांनी जगाचा घेतला निरोप
marathi.ndtv.com