चहलने धनश्री वर्मासोबतच्या नात्याबाबत दिले मोठे संकेत? इन्स्टा पोस्टमध्ये 'पती' म्हणून उल्लेख टाळला

Edited by Harshada J S Image credit: Yuzvendra Chahal Insta

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्माच्या घटस्फोटाची चर्चा ऐकायला मिळत आहे. 

Image credit: Yuzvendra Chahal Insta

धनश्री आणि चहलच्या इन्स्टावरील नव्या पोस्टमुळे त्यांच्या घटस्फोटाची चर्चा अधिकच रंगलीय. 

Image credit: Yuzvendra Chahal Insta

चहलने 9 जानेवारीला केलेल्या पोस्टद्वारे त्याच्या खासगी आयुष्याबाबत मोठे संकेत देत चाहत्यांनाही शांत राहण्याचे आवाहन केलेय. 

Image credit: Yuzvendra Chahal Insta

चहलने इन्स्टा पोस्टमध्ये नेमके काय म्हटलंय? जाणून घेऊया सविस्तर...

Image credit: Yuzvendra Chahal Insta

प्रेम व पाठिंब्याबाबत चाहत्यांचा मी आभारी आहे,ज्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. पण हा प्रवास संपलेला नाही: चहल

Image credit: Yuzvendra Chahal Insta

माझ्या देशासाठी, टीमसाठी आणि चाहत्यांसाठी अजूनही कित्येक ओव्हर्स बाकी आहेत. एक खेळाडू असल्याचा मला अभिमान आहे: चहल

Image credit: Yuzvendra Chahal Insta

 मी एक मुलगा, एक भाऊ, एक मित्रही आहे. आताच्या घडामोडी विशेषतः माझ्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत,हे समजू शकतो:चहल

Image credit: Yuzvendra Chahal Insta

दरम्यान मी सोशल मीडिया पोस्टमध्ये अशा काही गोष्टींवर चर्चा करताना पाहिलंय की ज्या खऱ्या असू शकतात किंवा नसूही शकतात:चहल

Image credit: Yuzvendra Chahal Insta

एक मुलगा, भाऊ, मित्र म्हणून मी नम्र विनंती करतो की या गोष्टी वाढवू नये. यामुळे माझ्यासह कुटुंबीयांना फार वेदना झाल्या आहेत: चहल

Image credit: Dhanashree Verma Insta

माझ्या कौटुंबिक मूल्यांनी सर्वांचे भले करावे, शॉर्टकटऐवजी परिश्रम करून यश मिळवण्याची शिकवण दिलीय, या मूल्यांप्रति मी वचनबद्ध आहे:चहल

Image credit: Dhanashree Verma Insta

देवाच्या आशीर्वादाने, सहानुभूती नाही पण मी कायम तुमचे प्रेम आणि पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करेन: चहल

Image credit: Dhanashree Verma Insta

चहलने या पोस्टमध्ये मुलगा, भाऊ, मित्र असा उल्लेख केलाय; स्वतःला पती म्हणणे टाळले आहे. 

Image credit: Dhanashree Verma Insta

चहलने या पोस्टमुळे त्याच्या आणि धनश्रीच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

Image credit: Dhanashree Verma Insta

आणखी वाचा

विराट कोहली घेऊ शकतो मोठा निर्णय,BGT सीरिजमधील खराब कामगिरीनंतर वाढला दबाव

marathi.ndtv.com