अमेरिकेचे प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञ (Political Expert) इयान ब्रेमर यांनी NDTV ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha 2024) भाकीतल वर्तवले आहे. ब्रेमर यांनी म्हटले की , भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 305 जागा जिंकू शकतो. ब्रेमर पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. भारत हा राजकीयदृष्ट्या सर्वात स्थिर देश असल्याचे ब्रेमर यांचे म्हणणे आहे.
ब्रेमर यांनी म्हटले की, राजकीयदृष्ट्या एकमेव स्थिर गोष्ट कोणती असेल तर ती भारतातील निवडणुका आहेत असं ब्रेमर यांचे म्हणणे आहे. भाजपला या निवडणुकीत 305 जागा मिळतील आणि या अंदाजात 10 जागांचा कमी अधिक फरक असू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.
ब्रेम हे युरेशिया नावाच्या समूहाचे संस्थापक आहेत. जोखीम ओळखणे आणि संशोधन करून संघटना संस्थांना मदत करण्याचे काम युरेशिया करते. ब्रेमर ही युरोप आणि आशिया खंडातील विविध देशांतील राजकीय स्थित्यंतरांचा आणि निवडणुकांचा अभ्यास करत असतात. अमेरिकेतही निवडणुका होत असून त्या पार्श्वभूमीवर बोलताना ब्रेमर यांनी म्हटले की, भारतातील निवडणुका या स्थिर आणि सुसंगत दिसत आहे. बाकी इतर सगळ्या निवडणुकांमध्ये समस्या दिसून येत आहेत.
जगभरात मोठी भू-राजकीय अस्थितरता आहे. कंपन्यांना अपेक्षित दिशेने जागतिकीकरणाचे भविष्य जाताना दिसत नाहीये. विविध ठिकाणी सुरू असलेली युद्धे, अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध आणि अमेरिकेतील निवडणुका याचाच एक भाग आहे असे ब्रेमर यांनी म्हटले आहे.
ब्रेमर यांनी पुढे म्हटले की, "या सगळ्या गोष्टी नीटपणे हाताळल्या जात नसून हा दबाव नकारात्मक आहे. सद्यस्थितीत स्थिर आणि सुसंगत दिसणारी एकमात्र गोष्ट आहे ती म्हणजे भारतातील निवडणुका. बाकी इतर सगळ्या गोष्टी समस्याग्रस्त आहेत. भारतातील निवडणुकीत काय होणार? कोणाला सत्ता मिळणार असा प्रश्न विचारला असता ब्रेमर यांनी म्हटले की, युरेशिया समूहाने केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे की भाजपला 295 ते 315 जागा मिळतील."
भारतातील राजकारणात अधिक अनिश्चितता नाही
ब्रेमर यांनी बोलताना म्हटले की त्यांना आकड्यांमध्ये फार रस नाहीये. ते म्हणाले की, "माझी रुची ही जगभरातील सगळ्या निवडणुकांमध्ये आहे (ज्यात युरोपियन महासंघाच्या आणि ब्रिटनमध्ये होणाऱ्या निवडणुकांचाही समावेश आहे) भारत ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे. यामध्ये सत्तेचे स्थित्यंतर इथे सहजनेतेन होते. भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये फार अनिश्चितता नाहीये."
ब्रेमर यांनी भारतातील स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचेही कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, "हे जवळपास निश्चित आहे की, मोदी हे निश्चितपणे मजबूत आर्थिक धोरणे आणि सुधारणांच्या बळावर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याच्या तयारीत आहेत. "
भारताच्या आर्थिक भविष्याबाबत बोलताना ब्रेमर यांनी म्हटले की, "संपूर्ण जगाने पाहिले आहे की, भारताने अनेक दशके खराब कामगिरी केली आहे. भारताकडे प्रचंड लोकसंख्या आहे आणि भारतीयांची बुद्धीमत्ता ही देखील अतुलनीय अशी आहे. अनेक अमेरिकी कंपन्यांचे सीईओ हे भारतीय आहेत. असं असतानाही अर्थव्यवस्थेच्या पातळीवर भारताची कामगिरी खराब राहिलेली आहे."
इयन ब्रेमर कोण आहेत ?
इयन ब्रेमर हे परदेशात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करणारे स्तंभकार आहेत. ते TIME मासिकाचे संपादक असून ते GZERO मीडिया कंपनीने अध्यक्ष आहेत. ही कंपनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वार्तांकन आणि विश्लेषण करते. ब्रेमर हे कोलंबिया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेयर्समध्ये भू-राजकीय परिस्थितीबाबत विद्यार्थ्यांना धडे देतात. द पॉवर ऑफ क्रायसिस या पुस्तकाचे ते लेखक आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world