14 minutes ago

Mumbai Rain LIVE Update:  मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ही पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहेत. सातारा जिल्ह्यातही मुसळधार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तिच स्थिती कल्याण डोंबिवलीत ही पाहायला मिळत आहे. रायगड आणि साताऱ्यात काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. राज्यात कुठे कुठे पावसाची काय स्थिती आहे याचे लाईव्ह अपडेट तुम्हाल इथं वाचता येतील. 

    

Jul 04, 2026 18:51 (IST)

Mumbai Rain : पश्चिम दृतगती मार्गांवर बोरोवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्यागतीने

मुंबई

पश्चिम दृतगती मार्गांवर बोरोवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्यागतीने

आज दिवसभर मुंबईत धुक्याच्या वातावरण आहे 

याचा वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवतोय, पावसात रस्ते निसरडे होतात

Jul 04, 2026 18:48 (IST)

Rain News: कोल्हापुरात संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर

कोल्हापुरात संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आज आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून बोटीची चाचणी आणि प्रशिक्षण देण्यात आलं.. बाजार भोगाव या ठिकाणी एनडीआरएफ आणि केडीआरएफच्या पथकाने याची प्रात्यक्षिके केली... या ठिकाणच्या ग्रामस्थ आणि काही शासकीय कर्मचाऱ्यांनी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला..

Advertisement
Jul 04, 2026 18:46 (IST)

Rain News: बारवी धरण क्षेत्रात ९ तासांत १०० मिमी पाऊस, पाणी पातळी ४ फुटांनी वाढली

​ठाणे जिल्हा आणि आसपासच्या शहरांची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात अखेर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. आज सकाळपासूनच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, अवघ्या ९ तासांत तब्बल १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत ४ फुटांची लक्षणीय वाढ झाली आहे.​ सकाळपासून धरण क्षेत्रात संततधार आणि मुसळधार पाऊस सुरूच आहे. प्रशासन आणि नागरिकांना मोठा दिलासा गेल्या काही दिवसांत पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा खालावला होता, ज्यामुळे पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आज झालेल्या  दमदार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे

Jul 04, 2026 17:36 (IST)

Rain News: मुसळधार पावसाचा मुंबई उपनगरी रेल्वे सेवेलाही फटका

सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरात जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचा फटका मुंबई उपनगरी रेल्वे सेवेलाही बसला आहे. विरार–चर्चगेट लोकल सेवा सुमारे अर्धा तास उशिराने धावत आहे. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, नालासोपारा स्टेशन परिसरात कंबरभर पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ते जलमय झाल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

Jul 04, 2026 17:35 (IST)

Rain News: मुंबई गोवा महामार्गानजीक उक्षी गावाकडे जाणा-या रस्त्यावर आली माती

 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उक्षी पुलाजवळ सुरू असलेल्या कामातील हलगर्जीपणाचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यावरून दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि चिखल उक्षीकडे जाणाऱ्या मार्गावर साचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.उक्षी पूल परिसरात संरक्षण भिंतीचे काम अद्याप अपूर्ण आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यामुळे दरड कोसळल्यानंतर माती थेट रस्त्यावर आली. त्यातच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. निसरड्या रस्त्यावरून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागतेय.रस्त्यावर साचलेला चिखल आणि माती तातडीने हटवावी, संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था त्वरित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

Jul 04, 2026 17:33 (IST)

Mumbai Rain: वसई पूर्वेकडील मधुबन परिसरात बचावकार्य सुरू, 25 जणांना वाचवले

वसई पूर्वेकडील मधुबन परिसरातील आहेत, जिथे मुसळधार पावसामुळे गंभीर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी गळ्यापर्यंत पोहोचल्याने स्थानिक रहिवासी अडकले होते.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. दोऱ्यांच्या साहाय्याने जवानांनी पाण्याखाली गेलेल्या भागात पोहोचून अंदाजे २० ते २५ जणांना वाचवले.

बचावकार्यादरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत काम केले. प्रशासनाने नागरिकांना पाणी साचलेले भाग टाळण्याचे आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Jul 04, 2026 16:47 (IST)

Rain News: नवी मुंबई महापालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन अलर्ट मोडवर; तक्रारींवर तातडीने कारवाई

काळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात पाच ठिकाणी पाणी साचल्याच्या आणि 10 झाडे कोसळल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात सुमारे 10 तक्रारी प्राप्त झाल्या असून, पाणी उपसा, झाडे हटविणे आणि इतर तक्रारींवर तातडीने कारवाई सुरू आहे.

Jul 04, 2026 16:27 (IST)

Kalyan Rain : कल्याण-शीळ मार्गावरील जुन्या पलावा रेल्वे उड्डाणपुलावरील रस्त्याचा भाग सरकला

 कल्याण-शीळ मार्गावरील जुन्या पलावा रेल्वे उड्डाणपुलावरील रस्त्याचा काही भाग सरकल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने संबंधित ठिकाणी बॅरिकेडिंग करून खबरदारीचे उपाय केले आहेत.मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याचा आणखी काही भाग खचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसे कडून करण्यात आली आहे.

Advertisement
Jul 04, 2026 16:26 (IST)

Mumbai Rain : मुंबईच्या महापौर रस्त्यावर उतरल्या

मुंबईच्या महापौर रस्त्यावर उतरल्या आहे. शिवाय नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा त्या आढावा घेत आहेत. 

Jul 04, 2026 16:23 (IST)

Rain News: उल्हासनगर मध्ये नागरिकांच्या घरात घरात पाणी

उल्हासनगर मध्ये नागरिकांच्या घरात घरात पाणी  शिरले आहे. आज पहाटे पासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे . पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. उल्हासनगरातील नालेसफाईवर नागरिकांचा संताप! व्यक्त केला आहे.उल्हासनगर कॅम्प एक कमला नेहरू नगर धोबीघाट परिसरात मोठ्या प्रमाणात साचले पाणी साचल्याचे दिसून आले आहे.नागरी वस्तीत आणि शिरल्याने पाणी, जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसापासून उल्हासनगर मधील या परिसरात नागरिक पाणी शिरल्याने त्रस्त आहेत

Jul 04, 2026 16:21 (IST)

Rain News: भिवंडी कल्याण बायपास जलमय

भिवंडी कल्याण बायपास जलमय 

पाणी भरल्याने भिवंडी कल्याण येण्याचा मार्ग पूर्ण पणे जाम 

कामानिमित्त बाहेर गेलेले तसेच भिवंडी मध्ये कामानिमित्त आलेले अडकून पडले

Jul 04, 2026 16:18 (IST)

Vasai Rain : वसई पूर्वेला पुरात अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन

मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई कामण – सर्जामोररी परिसरात सुरू असलेल्या L&T कंपनीच्या  कामादरम्यान काही कामगार पुराच्या पाण्यात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस, अग्निशमन दल आणि NDRF पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी पाच कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली तर, जवळपास 100 च्या आसपास कामगारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या तत्पर बचाव मोहिमेत अडकलेल्या  कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली.

Jul 04, 2026 16:16 (IST)

Rain News: अंबरनाथच्या शिवमंदिर ते रिलायन्स कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी

अंबरनाथच्या शिवमंदिर ते रिलायन्स कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर  पाणी साचले आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे मुख्य मार्ग जलमय झाल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत.नवीन पुलावरच पाणी साचल्याने पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहे. कोट्यवधींचा पूल पाण्याखाली गेल्याने पालिकेच्या नियोजनाचा फज्जा उडाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी निशान पाटील यांनी अनेक आंदोलन करून सुद्धा पालिकेने  दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Jul 04, 2026 16:15 (IST)

Mumbai Rain : ताज हॉटेल समोर मोठे झाड कोसळले

मुंबई

- ताज हॉटेल समोर मोठे झाड कोसळले

- झाड थेट रस्त्यात कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम 

- झाड कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान

Jul 04, 2026 16:14 (IST)

Mumbai Rain: मुख्यमंत्र्यांचे पावसाच्या पार्श्वभूमीवर आवाहन

राज्यात 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता. प्रशासन परिस्थितीकडे लक्ष ठेऊन. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन 

Jul 04, 2026 16:13 (IST)

Rain News: छगन भुजबळांच्या बंगल्याबाहेर गाडीवर झाड कोसळलं

छगन भुजबळांच्या बंगल्याबाहेर गाडीवर झाड कोसळलं. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे चालकाला बाहेर काढण्यात यश. तर  यवतमाळमध्ये नव्या पुलाची दुरवस्था... नव्याने बांधलेल्या पुलावरील डांबर पहिल्याच पावसात गेले वाहून... बांधकाम विभागाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण.

Jul 04, 2026 16:12 (IST)

Mumbai Rain : मुंबईच्या विक्रोळीतील डोंगराळ भागातील घर कोसळलं

मुंबईच्या विक्रोळीतील डोंगराळ भागातील घर कोसळलं. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना. चेंबूरमध्ये पुन्हा झाड कोसळलं. पुणे, रत्नागिरीतही झाडांची पडझड.

Jul 04, 2026 16:12 (IST)

Mumbai Rain: भांडुपच्या सोनापूर परिसरात पावसामुळे रस्ता खचला

भांडुपच्या सोनापूर परिसरात पावसामुळे रस्ता खचला आहे.  रस्त्यालगतची संरक्षक भिंतही कोसळली आहे. महापौर रितू तावडेंकडून घटनास्थळाची पाहणी केली आहे. 

Jul 04, 2026 16:10 (IST)

Mumbai Rain: मुंबईतील मुसळधार पावसामुळे मरीन ड्राईव्हचा समुद्र खवळला

मुंबईतील मुसळधार पावसामुळे मरीन ड्राईव्हचा समुद्र खवळला आहे. त्यामुळे  समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

Jul 04, 2026 16:09 (IST)

Mumbai Rain: अंधेरीच्या मिलन सबवेमध्ये साचलं पाणी

अंधेरीच्या मिलन सबवेमध्ये साचलं पाणी. सुरक्षेसाठी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. 

Jul 04, 2026 16:05 (IST)

Mumbai Rain: खारमध्ये अनेक घरांत घुसलं पाणी

मुंबईतील खार परिसरात नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. नालेसफाई योग्य न झाल्याचा नागरिकांना फटका. तर कुर्ला पूर्व रेल्वे स्थानक परिसरही पाण्याखाली.

 

Jul 04, 2026 16:03 (IST)

Rain News: पालघरमधील अनेक गावांचा संपर्क तुटला

नालासोपारा, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर. रेल्वे रुळ आणि सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय. पालघरमधील अनेक गावांचा संपर्क तुटला.

Jul 04, 2026 16:03 (IST)

Mumbai Rain: मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम.... सखल भाग पाण्याखाली... लोकल सेवा विस्कळीत... मुंबईला उद्याही रेड अलर्ट

Jul 04, 2026 16:01 (IST)

Kurla Rain : कुर्ला पूर्व रेल्वे स्थानक परिसर पूर्णत: जलमय, नागरिकांचा संताप

Kurla Rain : कुर्ला पूर्व रेल्वे स्थानक परिसर पूर्णत: जलमय, नागरिकांचा संताप 

Jul 04, 2026 15:59 (IST)

Rain LIVE Update: दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला

Rain News: मुंबईच्या दक्षिण भागात पावसाने परत एकदा जोर धरला आहे. यामुळे समुद्र अधिक जास्त खवळला आहे.