कळंबोलीच्या MES पब्लिक स्कुलची 10 वर्षे पूर्ण

9 जून 2014 ला कळंबोलीत या MES शाळेची सुरूवात झाली होती. आता या शाळेने कळंबोलीत परिसरात आपला दबदबा निर्माण केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पनवेल:

कंळबोलीच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पब्लिक स्कुलने आपली दहा वर्ष पुर्ण केली आहेत. 9 जून 2014 ला कळंबोलीत या शाळेची सुरूवात झाली होती. आता या शाळेने कळंबोलीत परिसरात आपला दबदबा निर्माण केला आहे. दहा वर्ष पुर्ण झाल्या निमित्ताने शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, स्कुल कमिटी अध्यक्ष देवदत्त भिशीकर, डॉ. रवीकांत झिरमाटे, डॉ. राजीव हजीरनीस आणि सुधीर भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर शाळेच्या मुख्याधिपीका मीनाक्षी जोशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )


 MES पब्लिक स्कुल कळंबोलीने आपली 10 वर्षे पूर्ण केली आहेत. शाळेत सीबीएससी बोर्डाचे शिक्षण दिले जाते. शाळांमध्ये असलेल्या स्पर्धातही शाळा सध्या अवल्ल स्थानी आहे. अगदी नर्सरीपासून दहावी पर्यंतचे वर्ग भरवले जातात. दहावीचा निकालातही शाळेने गेल्या दहा वर्षान नवे उच्चांक गाठले आहेत. कळंबोलीत शाळेने गेल्या दहा वर्षात आपला दबदबा निर्माण केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Live Update : आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक-सत्ताधारी आमनेसामने, सभागृहात प्रचंड गदारोळ

खाजगी क्लासेस पेक्षा शाळे जास्ती जास्त मुलांना चांगेल शिक्षण देण्यावर शाळेचा भर असतो. त्यामुळे शाळेचा निकालही चांगला लागत आहे. गेल्या दहा वर्षातला शाळेतला प्रवास या कार्यक्रमावेळी मुख्याधिपीका मीनाक्षी जोशी यांनी उलगडून सांगितला. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. भविष्यात आणखी उज्जवल कामगिरी करणार असल्याची प्रतिज्ञा यावेळी शिक्षकां बरोबरच विद्यार्थ्यांनी केली.