Ram Navami 2024 : देशभर सर्वत्र रामनवमीचा उत्साह आहे. श्रीराम हे विष्णूचे अवतार समजले जातात. सत्य, दया, धर्म, करुणा प्रत्येक बाबतीत श्रीरामाच्या चरित्राचं उदाहरण नेहमी दिलं जातं. त्यामुळेच 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हणूनही श्रीरामाला सर्वजण ओळखतात. श्रीरामाच्या आयुष्यातून प्रत्येकाला काही तरी शिकण्यासारखं आहे. विशेषत: त्यांच्या 5 महत्त्वाच्या गोष्टींचं तुम्ही अनुकरण केलं तर तुमचं आयुष्यही बदलून जाईल.
वचनासाठी कटिबद्धता
श्रीरामांनी वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी आनंदानं 14 वर्षांचा वनवास स्विकारला. राजवैभाचा मोह सोडून त्यांनी 14 वर्ष जंगला संन्यासी म्हणून राहण्याचा संकल्प केला. 'प्राण जाए पर वचन न जाए' ही म्हण त्यामधूनच आली असावी. एखाद्या गोष्टीचा संकल्प केला असेल तर त्यासाठी सर्व प्रकारचे कष्ट सहन केले पाहिजेत हे आपल्याला श्रीरामाकडून शिकता येईल.
गुरुंबद्दल आदर
श्रीरामांना त्यांचे गुरु वसिष्ठ ऋषींबद्दल नितांत आदर होता. ते त्यांची प्रत्येक आज्ञा ऐकत असत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगल्या गुरुची गरज असते. गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवेल ही श्रद्धा शिष्यामध्ये असणे आवश्यक आहे. अनेकदा योग्य गुरु न भेटल्यानं किंवा गुरुंचा आदर न केल्यानं आयुष्य भरकटल्याची उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. गुरुंचा आदर कसा करावा हे श्रीरामाकडून शिकलं पाहिजे.
प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव
नेतृत्त्व क्षमता
श्रीरामानं त्यांच्या जबरदस्त क्षमतेच्या जोरावर वनवासात असूनही बलाढ्य रावणाच्या सैन्याचा पराभव केला. श्रीरामांच्या नेतृत्त्वापासून प्रभावित होऊन वानरसेनेनं सागरावर पूल बांधला. त्यांच्या मदतीनं रावणाला पराभूत केलं. या सर्व गोष्टी श्रीरामांची नेतृत्त्व क्षमता सिद्ध करतात. श्रीराम चरित्रातील नेतृत्वगुणांचा अभ्यास केला तर तुम्हालाही चांगला बॉस, चांगला नेता होता येईल. तुम्ही तुमच्या टीमला प्रेरित करुन अनेक अवघड टार्गेटही पूर्ण कराल.
रामनवमीनिमित्त हवाई प्रवास महागला, अयोध्येसाठीच्या तिकीटदरात दुपटीने वाढ
मित्रप्रेम
श्रीरामांनी त्यांच्या आयुष्यात अनेक मित्र बनवले. वेगवेगळ्या गटातील आणि वयाच्या व्यक्तींना त्यांनी आपलसं केलं. त्यांना सन्मान दिला. श्रीराम आणि निषाद यांच्या मैत्रीचं उदाहरण तर प्रसिद्ध आहे. त्यांनी विभिषणाकडं लंकेची राजगादी सोपवली. सु्ग्रीवासोबतीची मैत्रीधर्म पाळण्यासाठी बालीचा वध केला. त्यांनी प्रत्येक पावलावर मित्रांना साथ दिली. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर मित्रांची साथ सोडू नये हेच श्रीरामाच्या आयुष्यापासून शिकलं पाहिजे.
रामनवमीनिमित्त साताऱ्याचे कंदी पेढे प्रभू श्रीराम चरणी; 1000 बॉक्स अयोध्येला पाठवणार
दयाळू वृत्ती
दयाळू व्यक्ती हा नेहमीच सर्वांच्या आदरास प्राप्त होतो. मनुष्य असो वा पशू श्रीरामानं प्रत्येकावर समान प्रेम केलं. स्वत: राजा असूनही त्यांनी वेळोवेळी सुग्रीव, केवट, निषादराज, जांबूवंत, विभीषण या सर्वांना नेतृत्त्व करण्याचा अधिकार दिला.