8 दिवसात 50 मृतदेह, 16 बेवारस, जळगाव जिल्हारूग्णालयातील धक्कादायक प्रकार

गेल्या 8 दिवसात रूग्णालयात एक दोन नाही तर तब्बल 50 मृतदेह आले आहेत. त्यातील 16 मृतदेह हे बेवारस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
जळगाव:

जळगाव जिल्हा रूग्णालयात एक धक्कादाय प्रकार समोर आला आहे. गेल्या 8 दिवसात रूग्णालयात एक दोन नाही तर तब्बल 50 मृतदेह आले आहे. त्यातील 16 मृतदेह हे बेवारस असल्याचे स्पष्ट झाले आहेत. या भागात सध्या उकाडा वाढत आहे. त्यामुळे हे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र त्या पैकी हे एक कारण असू शकते असं रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी स्पष्ट केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम दैनंदीन जिवनावर होत आहे. याच कालावधीत जळगाव जिल्हा रूग्णालयात एकामागून एक 50 मृतदेह दाखल झाले आहेत. त्यातील 16 मृतदेह हे बेवारस असल्याची धक्कादायक माहिती रूग्णालयाचे अधिष्ठाता गिरीष ठाकूर यांनी दिली आहे. जे बेवारस आहेत त्याचा वयोगट हा 40 ते 45 हा आहे. तर काही जण 65 ते 70 वयोगटातील आहेत. हे बेवावर रस्त्याच्या शेजारी राहाणारे, गरिबी किंवा भिकारी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यांना अनेकांना निमोनिया, लिव्हर संबधी आजार होते असे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे.   

हेही वाचा -  चहा पिण्याची तलफ अन् लाखोंचा गंडा; तात्यासाहेबांचं 'ते' स्वप्नही भंगलं! 

हे मृत्यू उष्माघातामुळे आहे का याबाबत डॉ. गिरीष ठाकूर यांनी माहिती दिली आहे. तसे सांगणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र उन्हाच्या त्रासाने मृत्यूची शक्यता त्यांनी नाकारली नाही.दरम्यान हे मृतदेह जिल्हा रूग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहेत. बेवारस मृतदेहांचे शवविच्छेदन करून सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Advertisement