Pune Maitri Club: वय वर्ष 60 तरी ही बांधली जातेय लग्नगाठ, 'त्या' 90 जणांची अनोखी कहाणी

त्यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात नवीन उत्साह आणि आनंदाची भर पडत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

अभिनेता अमिर खान वयाच्या 60 व्या वर्षी बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज आहे. त्याचं हे तिसरं लग्न ठरणार आहे. लग्न जरी तिसरं असलं तरी वयाच्या 60 व्या वर्षी तो लग्न करत असल्याने त्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत. वयाची साठी म्हणजे निवृत्तीचे वय. या वयात लग्न हा विचार कुणी करत असेल का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण अमिर एकटाच असा नाही, की जो वयाच्या 60 व्या वर्षी लग्न करतो. महाराष्ट्रातले अनेक असे साठीत नवे सुर जुळवणारे आहे. त्यांना ही संधी मिळाली पुण्याच्या मैत्री क्लबमुळे, त्यामुळे हा क्लब सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.    

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आमिर खान सारखे वयाच्या साठीत पुनर्विवाह करणारे 90 हून अधिक महाराष्ट्रीय असल्याचे समोर आले आहे. तेवढेच नाही तर  live in रिलेशनशिप मध्ये ही राहाणारे लोक आहे. माधव दामले हे पुण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी ही संधी या जेष्ठ नागरिकांना निर्माण करून दिली आहे. त्यामुळे जवळपास 90 पेक्षा जास्त लोकांनी वयाच्या साठीत लग्न गाठीत बंधणे पसंत केले आहे. अमिर खान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न बंधनात अडकणार आहे. पण हे 90 जण त्या आधीच लग्नबंधनात अडकले आहेत.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Satara News: 1 व्हिडीओ, 1 कोटीची खंडणी, 1 डॉक्टर हनीट्रॅपच्या जाळ्यात कसा अडकला? पुढे काय झालं?

दामले यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मैत्री क्लब' नावाची संस्था स्थापन केली आहे. हा क्लब वयाच्या साठी किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसाठी आहे. या क्लबच्या माध्यमातून पुनर्विवाह करण्यासाठी मदत करतो. शिवाय ज्यांना लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे त्यांनाही प्रोत्साहन देतो. त्याच बरोबर या क्लबच्या माध्यमातून नवीन मैत्री संबंध प्रस्थापित करण्यासाठी ही मदत करतो. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Dharashiv Crime : विवाहित महिलेसोबत प्रेमाची अशी मिळाली 'शिक्षा'; 18 वर्षांच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू 

वयाच्या साठीमध्ये अनेकांचे साथिदार बरोबर नसतात. काहींचा मृत्यू झालेला असतो. काही घटस्फोटीत असता. असा वेळी ते एकटे असतात. त्यांच्या जवळचा असा कुणी नसतो. अशा ज्येष्ठ नागरिकांच्या एकटेपणाचे निराकरण करणे हा या क्लबचा उद्देश आहे. त्यांना सामाजिक, भावनिक आधार प्रदान करण्यासही हा क्लब मदत करतो. माधव दामले यांच्या या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जीवनात नवीन आनंद आणि साथीदार मिळवले आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pakistan Attack: पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला, 90 सैनिक ठार झाल्याचा BLA चा दावा

त्यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात नवीन उत्साह आणि आनंदाची भर पडत आहे. त्यामुळे केवळ अमिर खान हा एकटा वयाच्या साठीत लग्नगाठ बांधणारा नाही, हे कार्य हा क्लब खूप आधी पासून करत आहे. यामुळे वयाच्या साठीनंतर एक नविन जिवन जगण्याचा मार्ग जेष्ठ नागरिकांना या माध्यमातून मिळत आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही उत्तम आहे. अमिर खान हा वयाच्या साठाव्या वर्षी गौरी स्प्रॅटबरोबर लग्न करणार आहे. त्यामुळे या वयात लग्न करावे का याची चर्चा सुरु झाली होती.