1000 Rupees Tea in Mumbai: मुंबईत 1000 रुपयांचा चहा मिळतो, यावर तुमचा विश्वास बसेल का? दुबईत राहणारे भारतीय ट्रॅव्हल व्लॉगर परिक्षित बलोची यांनी नुकताच भारतात केलेल्या प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. सध्या तो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्यांनी गंमतीशीरपणे सांगितले की, एका कप चहाने त्यांचे खिसे रिकामे केले. शिवाय या महागाईने त्यांना ही हादरून सोडले. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. शिवाय या चहा मागचं सत्य काय तेही त्यांनी सांगितलं आहे.
मुंबईचा चहा आणि 1000 रुपयांचा धक्का
परिक्षित यांनी सांगितले की, जेव्हा ते दुबईहून भारतात आले, तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार होता की, आता ते रुपयांमध्ये खर्च करतील आणि ‘राजासारखे जीवन' जगतील. पण, मुंबईतील एका हॉटेलमध्ये जेव्हा त्यांनी चहा मागवला आणि बिल 1000 रुपये आले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. ते हसत म्हणाले, ‘मी जेव्हा भारत सोडला होता, तेव्हा 1000 रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवायचो, आता एका कप चहामध्येच गेले. असं त्यांनी चेष्टेने म्हटलं आहे.
अनिवासी भारतीयांचे (NRI) प्रिव्हिलेज अन् खरा अनुभव
व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, अनिवासी भारतीय (NRI) अनेकदा असा विचार करतात की परदेशात कमावलेले पैसे रुपयांमध्ये बदलल्यावर त्यांचे जीवन भारतात सुखी होईल. पण यावेळी त्यांना नेमका उलट अनुभव आला. परिक्षित म्हणाले, ‘मी दिरहममध्ये कमावतो, त्यामुळे मला भारतात गरिबीची जाणीव व्हायला नको होती. पण इथला खर्च पाहून तर असं वाटतंय की फ्लेक्सी-पेमेंट प्लॅनची गरज आहे असं ही ते म्हणाले.
सामान्य भारतीय हे खर्च कसे मॅनेज करतात?
परीक्षित यांनी सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला आहे की, 'इथले लोक रोज एवढा खर्च कसा करतात? तुमच्याकडे किती पैसे आहेत?' त्यांचे म्हणणे आहे की, आता भारतातील खर्च पाहून त्यांना समजले आहे की गोष्टी तितक्या स्वस्त नाहीत, जेवढ्या अनिवासी भारतीय (NRI) समजतात. त्यांचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल झाला. अनेकांनी सांगितले की, 'हे सत्य आहे जे आता प्रत्येकाला मान्य करावे लागेल.' तर काहींनी मजेत लिहिले की, 'मुंबईचा चहा नाही, मुंबईचा ‘अनुभव' महाग आहे.'