विठ्ठलाच्या चरणी सुवर्णहार, किंमत ऐकून हैराण व्हाल

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी हैदराबादच्या एका भक्ताने शाही सुवर्णहाराचे दान केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पंढरपूर:

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी हैदराबादच्या एका भक्ताने शाही सुवर्णहाराचे दान केले आहे. हा सुवर्णहार हा 130 ग्रॅम वजनाचा आहे. या सुवर्णहाराची किंमत 8 लाख 36 हजार 550 रुपये इतकी आहे. हैदराबाद इथे राहाणाऱ्या विजया नायडू यांनी हा हार दान केला आहे. त्यांच्या कुटुंबीयां समवेत त्या पंढपूरात आल्या होत्या. त्यावेळी मंदीर समितीने त्यांचा सत्कारही केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सावळ्या विठुरायाच्या खजिन्यात आता नव्या दागिन्याची भर पडली आहे. हैदराबाद येथील विठ्ठलभक्त विजया नायडू यांनी तब्बल 130 ग्रॅम वजनाचा शाही सुवर्णहार नुकताच विठ्ठलास अर्पण केला आहे. या सुवर्णहाराची किंमत 8 लाख 36 हजार 550 रुपये इतकी आहे. अत्यंत देखणा सुबक कलाकृतीतून घडलेला हा सुवर्णहार विठ्ठलाच्या खजिन्यात नव्याने दाखल होतोय. विठ्ठल भक्त विजया नायडू यांनी सुवर्णहार विठ्ठलास दान करताच मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी या भक्तांचा यथोचित मंदिर प्रशासनाकडून सन्मान केला आहे.

हेही वाचा - यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर

याआधीही विठ्ठलाच्या चरणी अनेक भक्तांनी सुवर्णदान केले आहे. कोणी परदेशी चलनही पांडुरंगाच्या चरणी वाहात असतात. या आधी कल्याण इथल्या विठ्ठल भक्त असलेल्या वंदना म्हात्रे यांनी तब्बल 11 लाख रुपये किंमतीचा आणि जवळपास 19 तोळे वजनाचा सोन्याचा चंदनहार‌ विठुरायाला अर्पण केला होता. कार्तिकी एकादशीच्या आधी त्यांनी हे दान केले होते. 

Advertisement