संत तुकाराम महाराजांच्या पालखीला यंदा चेन्नईहून खास छत्री

संस्थानसाठी ही छत्री सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी खासह चेन्नईहून बनवून घेतली आहे. तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी ही छत्री वापरली जाईल.

जाहिरात
Read Time: 1 min
पुणे:

श्री संत तुकाराम महाराजांच्या 339 व्या पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने यंदा नवी वेलवेटची छत्री बनविण्यात आली आहे. संस्थानसाठी ही छत्री सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी खासह चेन्नईहून बनवून घेतली आहे. तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी ही छत्री वापरली जाईल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

ही छत्री विशेष कारागिरांकडून बनवून घेण्यात आली आहे. छत्रीला पुर्णपणे वेलवेटचे कापड वापरण्यात आले आहे. तर खास कारागिरांनी या छत्रीवर खास नक्षीकाम केले आहेत. हे नक्षीकाम हाताने करण्यात आले आहे. यामुळे यंदा पालखीसोहळ्यात ही छत्री एक आगळे वेगळे आकर्षण ठरणार हे निश्चित आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 13 वर्षाच्या मुलाचे अपहरण, 5 कोटीची खंडणी, 8 तासानंतर काय झालं?

ही छत्री रंगीत व सुरेख पद्धतीने तयार केलेली आहे. अब्दागिरी,गरूड टक्के,रेशमी ध्वज पताका या छत्रीवर आहे. त्यामुळे ही छत्री सर्वांचेच लक्ष वेधणारी ठरेल. त्याच बरोबर छत्रीवर शंख,चक्र,गंध,गरूड, हनुमान यांची चित्र ही आहेत. ही सर्व चित्रे हस्तकलेचा उत्तम नमुना आहेत. छत्रीच्या काड्या  बांबूच्या चिमट्यांपासून बनविल्या आहेत. ही छत्री पकडण्यासाठी आठ फूट उंचीच्या लोखंडी भक्कम पाइपचा वापर करण्यातआला आहे. छत्रीच्या वर पितळी कळस देखील बसविण्यात आला आहे.

Advertisement