पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार 2024 सोहळा पुण्यात पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अमिर खान एकाच मंचावर आले होते. त्यावेळी अमिर खानने जोरदार भाषण करत उपस्थितांची दाद मिळवली. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या शैलीत अमिर खान यांची स्तुती करत त्यांच्या कार्याचे कौतूक केले. शिवाय पाणी फाऊंडेशनचे काम काही जिल्ह्या पुरता न ठेवता ते संपूर्ण राज्यात सुरू करा असे प्रोत्साहन ही दिले. यावेळी दोघांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांची भरभरून दाद मिळाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमिर खान यांनी बोलताना सुरूवातीलाच सांगितले, शेतकऱ्याचे जीवन समृद्ध व्हावे यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्या तालुक्यात काम सुरू केले होते. त्याला काही प्रमाणात यशही आले. असं बोलत असताना अमिर म्हणाला की, देवेंद्रजी तुम्ही प्रत्येक वर्षी मला एक गोष्ट विचारता, की हे काम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कधी नेणार? पण आम्हाला थोडी भीती वाटते, असं अमिर म्हणाला. भिती वाटते म्हणाल्यावर सर्वांच्याच भूवया उंचावल्या. पण लगेचच अमिर याने पुढचे वाक्य उच्चारले. कारण ही जिम्मेदारी खूप मोठी आहे.
महाराष्ट्र हा युरोपातील कुठल्याही देशा पेक्षा मोठा आहे. जर्मनी पेक्षा ही महाराष्ट्र खूप मोठा आहे. म्हणून आम्हाला भीती वाटते की राज्यभर आपण पाणी फाउंडेशनच काम घेऊन जाऊ शकतो का? असं तो यावेळी म्हणाला. पण पाणी फाऊंडेशनने आता एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आम्ही आता फाउंडेशनचे काम राज्यभर करणार आहोत, असं ही त्याने यावेळी स्पष्ट केलं. पुढच्या वर्षीपासून हे काम महाराष्ट्रात होईल असं ही त्याने सांगितलं. यातून शेतकऱ्याचे आयुष्य सुधारण्यावर आमचा भर असेल असंही त्याने सांगितलं. शिवाय पाणी फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी वेळोवेळी मदत केल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, इंजिनिअर लेकाला मुस्लीम देशात अटक, प्रकरण काय?
यानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमिर खान आणि त्यांच्या पाणी फाऊंडेशनचे कौतूक केले. पाणी फाऊंडेशनने आपली सुरूवात काही तालुक्यां पुरती केली होती. त्यामुळे त्यांचा आणि माझा एकाच गोष्टीवरून वाद होता. मी त्यांना पाणी फाऊंडेशनचे काम तुम्ही मर्यादीत ठेवू नका असं सांगत होतो. ते संपूर्ण महाराष्ट्रात घेवून जा असं सांगत होती. आता माझी ही मागणी त्यांनी मान्य केली आहे. त्यासाठी शुभेच्छा देतो. राज्य सरकारचे या कामात त्यांना पुर्ण सहकार्य राहील असंही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.