MHADA News: काळाचौकीत 'अच्छे दिन'! 3,410 कुटुंबांना विनामूल्य मिळणार तिप्पट मोठी घरे; वाचा म्हाडाचा मेगा प्लॅन

Abhyudaya Nagar Redevelopment: मुंबईच्या मध्यवस्तीत असलेल्या काळाचौकी भागातील अभ्युदय नगरच्या रहिवाशांसाठी आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Abhyudaya Nagar Redevelopment: या प्रकल्पामुळे तब्बल 3410 कुटुंबांचे आयुष्य बदलणार आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Abhyudaya Nagar Redevelopment: मुंबईच्या मध्यवस्तीत असलेल्या काळाचौकी भागातील अभ्युदय नगरच्या रहिवाशांसाठी आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला या वसाहतीचा समूह पुनर्विकास प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरणार आहे. म्हाडाने या महाप्रकल्पासाठी विकासकाची निवड केली असून त्यांना अधिकृत स्वीकृती पत्रही प्रदान केले आहे. या प्रकल्पामुळे तब्बल 3410 कुटुंबांचे आयुष्य बदलणार असून, त्यांना आता त्यांच्या जुन्या लहान घरांच्या बदल्यात तिप्पट मोठे घर मिळणार आहे.

घराचा आकार तिप्पट वाढला

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रहिवाशांना मिळणारे चटई क्षेत्रफळ. सध्या या वसाहतीत रहिवासी केवळ 210 चौरस फुटांच्या छोट्या सदनिकांमध्ये राहत आहेत. मात्र, पुनर्विकासानंतर त्यांना तब्बल 641 चौरस फुटांची प्रशस्त सदनिका विनामूल्य मिळणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते मे. एम. जी. एन. ॲग्रो प्रॉपर्टीज प्रा. लि. आणि त्यांच्या समूहातील कंपन्यांना या कामाचे स्वीकृती पत्र (LOA) आज देण्यात आले.

Advertisement

( नक्की वाचा : Raja Shivaji चित्रपटाने उलगडले इतिहासातील विसरलेले पान; कोण होते शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे? )
 

अटींमध्ये बदल आणि रहिवाशांचा मोठा फायदा

या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवताना अनेक अडचणी आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांच्या महासंघासोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीत रहिवाशांच्या हितासाठी निविदेच्या अटींमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल करण्यात आले. 

नव्या निर्णयानुसार, प्रत्येक सदनिकाधारकाला 5 लाख रुपये कॉर्पस फंड दिला जाणार आहे. तसेच, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रत्येक कुटुंबाला दरमहा 25,000 रुपये घरभाडे विकासकाकडून दिले जाईल. विशेष म्हणजे, प्रत्येक सदनिकेसोबत एक स्वतंत्र पार्किंगची जागाही रहिवाशांना मिळणार आहे.

( नक्की वाचा : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला आकाशात वादळाचा विळखा; 8 जणांचा जीव टांगणीला! वाचा लेटेस्ट अपडेट )

33 एकरवरील भव्य वसाहतीचा चेहरामोहरा बदलणार

काळाचौकी येथील अभ्युदय नगर ही वसाहत एकूण 1,33,593 चौरस मीटर म्हणजे सुमारे 33 एकर क्षेत्रफळावर पसरलेली आहे. सध्या येथे एकूण 48 इमारती असून त्यामध्ये 3335 निवासी सदनिका आणि 75 अनिवासी गाळे आहेत. अनेक वर्षांपासून या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित होता. 

आता म्हाडाच्या मुंबई मंडळाने 'बांधकाम व विकास' (Construction and Development) या तत्त्वावर हा प्रकल्प हाती घेतल्यामुळे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा टॉवर्समध्ये राहण्याचे रहिवाशांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Advertisement

या प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने 27 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर 6 मार्च 2026 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध झाला आणि निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली. शासनाच्या उच्चाधिकार समितीने दिलेल्या मान्यतेनंतर आज या प्रकल्पाला अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. 

या प्रकल्पामुळे केवळ अभ्युदय नगरच नाही, तर संपूर्ण काळाचौकी परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून हा मुंबईतील एक आदर्श समूह पुनर्विकास प्रकल्प ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Topics mentioned in this article