पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, 5 जणांचा मृत्यू 42 जण जखमी

बस दहा ते पंधरा फुट खोल दरीत कोसळली. यात 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 42 जण जखमी झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला आहे. डोंबिवलीतून भावीकांना घेवून एक बस पंढपूरच्या दिशेने चालली होती. त्यावेळी समोर अचानक ट्रॅक्टर आला. त्यावेळी चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले. त्यांने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. त्यानंतर ही बस दहा ते पंधरा फुट खोल दरीत कोसळली. यात 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 42 जण जखमी झाले आहेत. जखमींना एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डोंबिवलीचे लोढा परिसरातील भावीक पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला निघाले होते.54 जण या बसने पंढपूरच्या दिशेने रवाना झाले. पंढरीच्या विठ्ठलाला भेटणार यामुळे भाविकांमध्ये उत्साह होता. पण पुढे काय होणार आहे याची पुसटती कल्पनाही त्यांना नव्हती. अचानक जवळपास पावणे एकच्या सुमारास या बसचा अपघात झाला. बसने मागून पुढे असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर बस चालकाचे गाडीवरचे नियंत्रण पुर्णपणे सुटले. त्यानंतरही गाडी खोल दरीत कोसळली. त्यात पाच भाविकांना जबर मार लागला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर 42 जण जखमी झाले. त्यांना तातडीने पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात हलवण्यात आले. 

ट्रेंडिंग बातमी - संभाजी राजे फक्त एकाच धर्माच्या अतिक्रमणाच्या विरोधात आहेत? पोलीस स्टेशन बाहेर उभे राहून दिले आरोपांना उत्तर

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टर चालवण्यास बंदी आहे. असे असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेस वेवर धावत होता. त्यामुळेच हा अपघात झाला आहे. अशा वेळी ट्रॅक्टर एक्सप्रेस वेवर कसा आला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय तो हायवे पोलिसांचे लक्ष चुकवून कसा आला? हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मात्र या ट्रॅक्टरमुळे पंधरीला निघालेल्या या भाविकांवर मात्र काळाने घाला घातला.