अदाणी इलेक्ट्रिसिटी मार्फत मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना वीजपुरवठा करण्यात येतो. अदाणी इलेक्ट्रिसिटी कंपनीने गणपती बाप्पाच्या विसर्जन स्थळी 15 बीएमसी वॉर्डांमध्ये 167 ठिकाणी 2,571 हून अधिक फ्लडलाईट्स लावले आहेत. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी वीजेची सोय करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांच्या आनंद द्वीगुण झाला आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने 5 ते 14 सप्टेंबर 2025 या काळात होणाऱ्या माऊंट मेरी जत्रेसाठी वांद्रे येथील माऊंट मेरी चर्चच्या परिसरात 80 फ्लडलाईट्स बसवले आहेत.
अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "या सणासुदीच्या दिवसांमध्ये आमच्या ग्राहकांना आणि सर्व भाविकांना विश्वसनीय आणि अखंडित वीजपुरवठा देणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आमचे कर्मचारी सर्व आवश्यक उपकरणे आणि सामग्रीसह पूर्णपणे तयार आहेत. गणपती विसर्जनाच्या दिवसांमध्ये आणि माऊंट मेरी जत्रेच्या वेळी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी शहराच्या विविध ठिकाणी तैनात आहेत. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मंडपांच्या सोयीसाठी, अदाणी इलेक्ट्रिसिटीने तात्पुरत्या वीज जोडणीची प्रक्रिया सुलभ केली आहे. जेणेकरून अर्ज सादर केल्याच्या 48 तासांच्या आत गणेश मंडळांना वीज जोडणी मिळेल. या वर्षी, जवळपास 1,000 गणेश मंडळांनी त्यांच्या सुरक्षित आणि आनंददायी उत्सवांसाठी अदानी इलेक्ट्रिसिटीची निवड केली आहे. असं ही प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. सध्या मुंबईत गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. त्यात अदणी समूहानेही त्यात आपली उपस्थिती या माध्यमातून दर्शवली आहे.