जबरदस्त योगायोग! जुळ्या भावांना मिळाले समसमान गुण

सिंधुदुर्गच्या दोडामार्ग इथे एक भन्नाट व विलक्षण निकाल पाहायला मिळतोय. दोडामार्ग तालुक्यातील मणेरी धनगरवाडी येथील नितेश लक्ष्मण खरवत आणि मितेश लक्ष्मण खरवत या जुळ्या भावंडाना 12 च्या परीक्षेत जुळे मार्क मिळाले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
सिंधुदुर्ग:

गुरुप्रसाद दळवी 

काही गोष्टी विलक्षण योगायोगाने घडत असतात. त्यामुळे त्या चर्चेच्या केंद्र स्थानी येतात. माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यावर सर्वात जास्त गुण मिळवल्यांची चर्चा नेहमीच होते. पण सिंधुदुर्गच्या दोडामार्ग इथे एक भन्नाट व विलक्षण निकाल पाहायला मिळतोय. दोडामार्ग तालुक्यातील मणेरी धनगरवाडी येथील नितेश लक्ष्मण खरवत आणि मितेश लक्ष्मण खरवत या जुळ्या भावंडाना 12 च्या परीक्षेत जुळे मार्क मिळाले आहेत. महत्वाचे म्हणजे 10 मध्ये सुद्धा सेम टू सेम मार्क या दोघांना होते. त्यामुळे नितेश आणि मितेश हे भाऊ भलतेच चर्चेत आले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नितेश आणि मितेश हे दोघेही जुळे भाऊ दोडामार्ग इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आहेत. 10 नंतर 12 वीचे शिक्षणही त्यांचे याच शाळेत झाले. दोघांनीही कला शाखेतून 12 वीची परीक्षा दिली होती. या दोन्ही विद्यार्थ्यांना विषयात मिळालेले गुण वेगवेगळे असले तरी गुणांची एकूण बेरीज सारखी आहे हे विशेष. मार्च 2022 साली झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्यांना 60 टक्के तर आता नुकत्याच  निकाल जाहीर झालेल्या 12 वीच्या परीक्षेत 53.33 टक्के गुण या जुळ्या भावांना मिळाले आहेत.

Advertisement

हेही वाचा - विधानपरिषदेसाठी ठाकरेंनी उमेदवारांची केली घोषणा, कोणाला उमेदवारी कोणाचा पत्ता कट?

नितेश आणि मितेश खरवत पाचवीमध्ये असताना त्यांच्यावरील वडिलांचे छत्र हरपले. आईवर संसाराची जबाबदारी आली. त्या दोघाना थोडी समज आल्यावर त्यांनी आईला तिच्या कामात मदत करायला सुरुवात केली. त्यानी 10 वीचे शिक्षण झाल्यावर मौज मजेत वेळ घालवला नाही. दोघेही शहरात किराणा दुकानात कामाला राहिले. सकाळी ते महाविद्यालयात जायचे आणि अर्धवेळ दुकानात काम, असा त्यांचा दिनक्रम असायचा. 12 वी परिक्षेवेळी ते रिकामी राहिले नाहीत. गावात काजू गोळा करण्याच्या कामाला जायचे. कमी वयात त्यांना असलेली समज कौतुकास्पद आहे  नितेश आणि मितेश हे आई आपल्या कुटुंबासाठी घेत असलेले कष्ट पाहत आहे. त्यांना आईच्या कष्टाचा आधार आहे. त्यांचे आईवर अपार प्रेम आहे. आईने आम्हाला जिद्दीने शिकविले आहे असे ते बोलताना सांगतात.

Advertisement

Advertisement