Ashadhi Wari: आळंदी ते पंढरपूर, माऊलींसाठी रांगोळीच्या पायघड्या! 15 वर्षापासून सेवा करणारी तरुणी

या युवतीने विविध धार्मिक आणि वारकरी परंपरेचे संदेश देणाऱ्या सुंदर रांगोळ्यांनी पालखी मार्ग सजवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी विविध उपक्रमांतून सेवा केली जाते
  • पुण्यातील मंचरची रांगोळी आर्टिस्ट तरूणी पंधरा वर्षे पालखी मार्गावर रांगोळी काढते
  • ती आळंदी ते पंढरपूर या मार्गावर मोठ्या आणि आकर्षक रांगोळ्या काढून माऊलींच्या पालखीचे स्वागत करते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेन निघाली आहे. ती दिवेघाटातून पुढे सरकरली आहे.   संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक जण विविध उपक्रम राबवत असतात. कोणी जेवण देतं. तर कुणी पाण्याची सोय करतं. तर कुणी निवारा देतं. त्यात एका युवतीने अनोखी सेवा केली आहे. तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही तरुणी पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढत आहे.  ही युवती थेट पंढरपूरपर्यंत सेवा करण्याचा संकल्प पूर्ण करणार आहे.

नक्की वाचा - Beed News: मुक्ताईच्या वारकऱ्यांची सेवा करणारी 325 वर्षांची निजामकालीन परंपरा काय? पाचवी पिढी आज ही कार्यरत

राजश्री भागवत जुन्नरकर असं या तरुणीचं नाव आहे. ती पुण्याच्या मंचरची राहणारी आहे. ती प्रोफेश्न रांगोळी आर्टीस्ट आहे. पण वारी काळात ती आपलं काम थांबवते. ती पंधरा दिवस आळंदी ते पंढरपूर या मार्गावर माऊलींच्या पालखीसाठी रांगोळ्यांच्या पायघड्या टाकत असते. संपूर्ण मार्गात ती अशा रांगोळ्या काढते. गेल्या पंधरा वर्षापासून ती अशा पद्धतीने माऊलींची सेवा करत आहे. जीथे जागा दिसेल तिथे, जेवढी मोठी होईल तितकी मोठी रांगोली ती काढते. ही रांगोळीच माऊलींच्या पालखीचं स्वागत करते. 

Advertisement

नक्की वाचा - Ashadhi Wari: माऊलींच्या पालखी सोहळ्यात अजितदादांची एन्ट्री! एकच वादाची घोषणा अन् सेल्फीसाठी गर्दी, प्रकार काय

या युवतीने विविध धार्मिक आणि वारकरी परंपरेचे संदेश देणाऱ्या सुंदर रांगोळ्यांनी पालखी मार्ग सजवला आहे. तिच्या या कलात्मक आणि भक्तिभावपूर्ण सेवेमुळे वारकरी, भाविक आणि नागरिकांनी तिचे विशेष कौतुक केले. ती सेवा निशुल्क करते. हे करत असताना कोणताही थकवा येत नाही. माऊलीच ही सेवा करून घेतात असं ती म्हणते. शिवाय आपण ही कला कुठेही शिकलो नाही. ही माऊलीच्याच कृपेने आपल्याला येते असं तिने यानिमित्ताने सांगितलं आहे. पंढरपूर पर्यंत आपण ही सेवा करणार असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.