Ashadhi Wari: वारीच्या वाटेवर टाळ अन् घुंगरूचा संगम! गेल्या 32 वर्षापासून लावणी अन् वारकऱ्याची अनोखी परंपरा

आम्ही दर वर्षी हा कार्यक्रम करतो. आम्ही वारकऱ्यांची यातून सेवा करतो. या सेवेचाआनंद आम्हाला मिळतो.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

देवा राखुंडे 

संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रम करत आहेत. हजारो विठ्ठल भक्त या वारीत सहभागी होत आहे. पायी चालत चालत पंढरपूरच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. अशा वेळी वारकरी चालून थकतात. क्षण भर विश्रांतीसाठी ते कुठेना कुठे विसावा हा घेतच असतात. असचं एक विसाव्याचं ठिकाण दौंड तालुक्यातील वाखरी या गावात आहे. वारकऱ्यांसाठी हा विसावा खास आहे. त्याला कारण ही तसेच आहे.  संत तुकोबांच्या वारीत दौंड तालुक्यातील वाखारी येथे टाळ आणि चाळाचा संगम पहायला मिळतो.या ठिकाणी लावणी आणि अभंगाच्या सादरीकरणातून वारकऱ्यांचे मनोरंजन करण्यात येतं. गेल्या बत्तीस वर्षांपासून न्यू अंबिका कला केंद्राच्या माध्यमातून अशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा केली जाते. 

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा असं इथल्या महिला कलाकार मानतात. त्यामुळे गेली 32 वर्ष न चुकता ही मनोरंजनाची सेवा या गावात केली जाते. विठ्ठलाचे भक्त ही याचा आनंद घेतात. क्षणभर विश्वांतीतून मनोरंजन होतं. इथं लावणी ही सादर केली जाते त्याच सोबत अभंग ही गायले जातात. न्यू अंबिका कला केंद्राचा हा 32 वर्षापासूनचा उपक्रम आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकार सांगतात की, आम्ही दर वर्षी हा कार्यक्रम करतो.  आम्ही वारकऱ्यांची यातून सेवा करतो. या सेवेचाआनंद आम्हाला मिळतो. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा असं ही त्या सांगतात.  

Advertisement

नक्की वाचा - Ashadhi Wari: आळंदी ते पंढरपूर, माऊलींसाठी रांगोळीच्या पायघड्या! 15 वर्षापासून सेवा करणारी तरुणी

डॉ अशोक जाधव यांनी 32 वर्षा पूर्वी ही सेवा सुरू केली. ती एक परंपरा बनली आहे. या महिला कलाकारांनी ही सेवा सुरूच ठेवली आहे. आम्ही वारीला जावू शकत नाही. पण वारकऱ्यांच्या सेवेतून विठ्ठल भक्तीचा आनंद भेटतो असं ही या कलाकार या निमित्ताने सांगतात. सकाळी आठ वाजल्या पासून त्या आपल्या कलेचे सादरीकरण करतात. वारकरी या कलेचा आनंद घेतात. या वर्षी ही या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. वारकऱ्यांच्या रूपात पांडूरंगाचं दर्शन होतं असं काहींनी सांगितलं. तर काही महिला कलाकारांनी सर्वांना सुखी राहू दे, कलाकार सुखी राहू दे. बळी राजा खुश राहू दे. अशी प्रार्थना केली.  

नक्की वाचा - Beed News: मुक्ताईच्या वारकऱ्यांची सेवा करणारी 325 वर्षांची निजामकालीन परंपरा काय? पाचवी पिढी आज ही कार्यरत

काहींनी सांगितलं की आजचा दिवस आनंदात गेला. आम्ही कलेच्या माध्यमातून ही सेवा करतो. त्यामुळे आम्हाला प्रतिसाद ही चांगला मिळाला आहे. तर या कला केंद्राचे संचालक अशोक जाधव यांनी ही आपली प्रतिक्रीया दिली आहे. कलावंतासाठी महाराष्ट्रात लावणी महत्वाची आहे. ती जिवंत राहायला हवी अशी आमची प्रार्थना आहे असं जाधव म्हणाले. सध्या डीजे संस्कृती सुरू झाली आहे. ते बंद झाले पाहीजे. पारंपारीक लावणी सुरू राहीली पाहीजे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली जाते. दरम्यान कला केंद्राच्या माध्यमातून केवळ लावणी नाही तर  10 हजार वारकऱ्यांना जेवण दिले जाते.