Atal Setu Potholes: 17,840 कोटींच्या अटल सेतूवर दीड वर्षातच खड्डे; MMRDA ने दिले स्पष्टीकरण

Atal Setu Potholes : मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक अर्थात अटल सेतूवरील रस्त्यावर पावसाळ्यात काही ठिकाणी किरकोळ भेगा (surface distress) आणि खड्डे (potholes) आढळून आल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) तातडीने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Atal Setu : अटल सेतूवरील खड्ड्यांवर MMRDA नं स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई:

Atal Setu Potholes : मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक अर्थात अटल सेतूवरील रस्त्यावर पावसाळ्यात काही ठिकाणी किरकोळ भेगा (surface distress) आणि खड्डे (potholes) आढळून आल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) तातडीने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. अतिशय जोरदार पाऊस आणि सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर हे दोष निर्माण झाल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. सोशल मीडिया नेटवर्क X वर याबाबत एक व्हिडिओ एका नेटिझन्सनं पोस्ट केला होता. त्याला उत्तर देताना MMRDA नं ट्विट करत ही माहिती दिली आहे. 

दुरुस्तीसाठी तातडीचे उपाय

बिस्मेनचा वापर: एमएमआरडीएने केवळ लहान भाग दुरुस्त करण्याऐवजी, एकसमानता राखण्यासाठी आणि प्रवासादरम्यान धक्के बसू नयेत यासाठी लांब पट्ट्यांमध्ये डांबरीकरण (bitumen resurfacing) सुरू केले आहे.

मॅस्टिक डामरचा वापर: पावसामुळे रस्ता सुरक्षित आणि वापरण्यायोग्य ठेवण्यासाठी मॅस्टिक डामर (mastic asphalt) पॅचिंगची कामेही सुरू आहेत.

पावसाळा संपल्यानंतर आणि 'हॉट मिक्स प्लांट्स'चे (hot mix plants) काम सुरू झाल्यानंतर, रस्ते अधिक टिकाऊ आणि चांगल्या दर्जाचे बनवण्यासाठी कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे केली जातील. यासाठी उच्च दर्जाच्या 'डेन्स बिटुमिनस मॅकॅडम' (Dense Bituminous Macadam - DBM) आणि 'डांबरी काँक्रीट' (Asphalt Concrete - AC) च्या थरांचा वापर केला जाईल, असेही MMRDA नं स्पष्ट केलंय. 

कंत्राटदारावर कारवाई

एमएमआरडीएने या दोषांसाठी कंत्राटदारावर कठोर कारवाई केली असून, त्यांना 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, रस्त्याच्या दीर्घकाळ कार्यक्षमतेची खात्री करण्यासाठी 'डिफेक्ट्स लायबिलिटी पीरियड' (Defects Liability Period - DLP) एक वर्षाने वाढवण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Mumbai Monorail Services : मुंबईकरांनो, मोनोरेल तात्पुरती बंद; हजारो प्रवाशांना बसणार फटका! वाचा काय आहे कारण? )
 

एमएमआरडीएने सांगितले की, ते जागतिक दर्जाच्या मानकांप्रति कटिबद्ध आहेत. अटल सेतू मुंबईकरांसाठी एक सुरक्षित आणि विश्वसनीय दुवा म्हणून कायम राहील यासाठी वेळेवर देखरेख आणि दुरुस्तीची कामे केली जातील.