राज्य सरकारने काही सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. मात्र त्यात आता बदल करण्यात आला आहे. या आधी 5 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्या दिवशी मुंबईसह परिसरातल्या बँकाना सुट्टी मिळणार होती. मात्र ती सुट्टी रद्द करण्यात आली. त्यात काही बदल करण्यात आले. त्यानुसार 5 ऐवजी ती सुट्टी आता 8 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी 8 सप्टेंबरला आता मुंबई आणि उपनगरातल्या सर्व बँकाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी बँका या बंद राहाणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने 8 सप्टेंबर 2025 रोजी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, 1881 च्या कलम 25 नुसार सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यापूर्वी जाहीर केलेली 5 सप्टेंबर 2025 ची सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार, 8 सप्टेंबर, 2025 रोजी सरकारी रोखे, परकीय चलन, मनी मार्केट आणि रुपया व्याजदर डेरिव्हेटिव्ह्जमध्ये कोणतेही व्यवहार आणि सेटलमेंट होणार नाहीत, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. 8 सप्टेंबर 2025 म्हणजेच सोमवारी होणाऱ्या सर्व प्रलंबित व्यवहारांचे सेटलमेंट पुढील कामकाजाच्या दिवशी म्हणजेच 9 सप्टेंबर 2025 मंगळवारी होईल. 4 सप्टेंबर 2025 गुरुवारी झालेल्या भारत सरकारच्या दिनांकित रोख्यांच्या लिलावाचे सेटलमेंट 9 सप्टेंबर 2025 मंगळवारी होईल.
नक्की वाचा - Mamata banerjee: ठाकरेंच्या पावलावर ममता बॅनर्जींचे पाऊल! बंगालमध्ये घेतला मोठा निर्णय
लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी (LAF) अंतर्गत स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी (SDF) आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) विंडो सुधारित सुट्टीनुसार उपलब्ध असतील. राज्य सरकारने मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी ईद-ए-मिलादच्या सार्वजनिक सुट्टीत बदल केला आहे. यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी असलेली सुट्टी आता 8 सप्टेंबर रोजी असेल. या निर्णयानुसार, मुंबई आणि उपनगरांतील सर्व बँका देखील आता शुक्रवार, 5 सप्टेंबरऐवजी सोमवार, 8 सप्टेंबर रोजी बंद राहतील, असे रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केले आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच सोमवारी बँका बंद राहातील.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन मोठे सण एकाच वेळी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला झाली. या दिवशी गणपती विसर्जन मिरवणुका निघतात, ज्यात मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. यामुळे 5 आणि 6 सप्टेंबर असे सलग दोन दिवस मोठ्या मिरवणुका आणि गर्दी व्यवस्थापनाचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले होते. नागरिक सेवा आणि पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी, तसेच गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी ईद-ए-मिलादची सुट्टी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.