या आठवड्यात दिवाळी आहे. त्यामुळे हा आठवडा सुट्ट्यांचा आहे. शाळांपासून सरकारी कार्यालयांनाही सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. अशा स्थितीत दिवाळीत बँकांना किती दिवस सुट्टी असणार आहे याची चर्चा होत आहे. सणासुदीचे दिवस असल्याने या काळात बँकांचे व्यवहार होतात. पण सुट्टी असेल तर त्यात अडथळा निर्माण होते. त्यामुळे बँकाची कामे आधीच करावी लागतात. त्यामुळे सोमवारी बँकाना सुट्टी आहे की नाही हा प्रश्न आहे. सोमवारी दिवाळी आणि नरकचतुर्थी आहे. त्यामुळे सोमवारी या दिवशी काही राज्यातील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रातल्या बँका सोमवारी सुरू राहाणार आहेत.
ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अनेक महत्त्वाचे सण येत आहेत. त्यामुळे बँकांच्या कामाकाजावर परिणाम होणार आहे. दिवाळी आणि संबंधित सणांमुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या काळात बँकांना सुट्ट्या असतील. महाराष्ट्रात कोणत्या दिवशी बँक बंद आहे, हे तपासूनच कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी आहे. त्याच दिवशी नरक चतुर्दशी ही आहे. या निमित्त मणिपूर, महाराष्ट्र, ओडिशा, आणि जम्मू आणि काश्मीर वगळता देशातील बहुतांश राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे या दिवशी आपले महत्त्वाचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करणे सोयीचे ठरेल.
तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी दिवाळी अमावस्या आणि लक्ष्मीपूजन आहे. त्या दिवशी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये बँका बंद राहतील. त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे महाराष्ट्रातील बँकांना 21 ऑक्टोबरला सुट्टी असेल. यानंतर, 22 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा पाडवा आहे. त्या दिवशी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये बँकांचे कामकाज होणार नाही. या सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजे 21 आणि 22 या दोन दिवशी महाराष्ट्रातल्या बँका बंद असणार आहेत.
23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज (Bhai Dooj) आणि इतर स्थानिक सणांमुळे गुजरात, सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये बँका बंद असतील. पण या दिवशी महाराष्ट्रातील बँकाना मात्र सुट्टी नाही. त्या दिवशी या बँका सुरू राहातील. या सर्व सुट्ट्यांमध्ये ऑनलाइन बँकिंग (Net Banking) आणि ATM सेवा सुरू राहतील. त्यामुळे बँकाची कामे सुट्ट्या पाहून पूर्ण करावीत.