WhatsApp उघडण्याआधी 'हे' आताच वाचा, GhostPairing मुळे तुमचं अकाऊंट होणार हॅक, 'या' सेटिंग्ज बदला

वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मेसेजिंग अॅपमध्ये एक नवीन अकाउंट हॅकिंग टेक्नोलॉजी असल्याची माहिती उघडकीस आलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
WhatsApp New Hack Technology

WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मेसेजिंग अॅपमध्ये एक नवीन अकाउंट हॅकिंग टेक्नोलॉजी असल्याची माहिती उघडकीस आलीय. याच्या माध्यमातून अॅपच्या योग्य डिव्हाईस-लिंकिंग सुविधेचा गैरवापर केला जाऊ शकतो.एका सायबर सुरक्षा कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. या तंत्रज्ञानाला 'GhostPairing', असे नाव देण्यात आले आहे. हे धोकादायक असून याद्वारे कर्स कोणताही पासवर्ड,सिम कार्ड किंवा ऑथेंटिकेशन कोड नसतानाही वापरकर्त्याच्या डिव्हाईसचा अॅक्सेस मिळवू शकतात.जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

सायबरसेक्युरिटी कंपनी Gen Digital ने या हॅकिंग तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, अॅपच्या वैध डिव्हाईस-लिकिंग सुविधेचा गैरवापर करून  हॅकर्स दुसरं डिव्हाईस हॅक करू शकतात. यासाठी हॅकर्सना डिव्हाइसच्या सॉफ्टवेअरशी छेडछाड करण्याची गरज नाही.ते अशा सोशल ट्रिकचा वापर करतात ज्यामुळे वापरकर्त्याची फसवणूक होते आणि हॅकर्सना डिव्हाईसचं अॅक्सेस मिळतं. 

ही नवी टेक्नोलॉजी किती धोकादायक?

WhatsApp हॅकिंगची ही नवी टेक्नोलॉजी इतकी धोकादायक आहे की, डिव्हाईस कसं हॅक झालं? याचा शोध घेणं कठीण बनतं. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हे खूप वेगाने पसरते आणि तुमचे विश्वासार्ह कॉन्टॅक्ट्सही यात सामील होऊ शकतात. तुमचे जवळचे वापरकर्ते याचा माध्यम बनू शकतात.ही प्रक्रिया एका छोट्या मेसेजपासून सुरू होते. "हे, मला तुझा एक फोटो मिळाला आहे!", अशाप्रकारचा एक मेसेज लिंकसोबत जोडलेला असतो.

नक्की वाचा >> Viral Video: "आता तू बघच..", रात्रीच्या प्रवासादरम्यान Rapido ड्रायव्हरने महिलेसोबत केलं घाणेरडं कृत्य

जो फेसबुक स्टाइलच्या प्रीव्ह्यूमध्ये दिसते.वापरकर्त्याने क्लिक करताच एक फेक वेबपेज उघडतं. जे फेसबुक फोटो व्ह्यूअर सारखं दिसतं. 
पण या व्हेरिफिकेशनमध्ये कुठेही Facebook चा समावेश नसतो. पण हे पेज WhatsApp च्या अधिकृत डिव्हाईस पेअरिंग प्रक्रियेला सुरू करते. त्यानंतर वापरकर्त्याला त्याचा फोन नंबर टाकण्यास सांगितलं जातं. त्यानंतर त्याला एक कोड दिला जातो. जो त्याला व्हाट्सअॅपमध्ये टाकावा लागतो. वापरकर्त्याला वाटते की, हा रुटिन सेक्युरिटी चेक आहे. 

Advertisement

WhatsApp हॅक झाला आहे, हे वापरकर्त्याला समजतच नाही

त्यानंतर वापरकर्त्याला त्याचा फोन नंबर टाकण्यात सांगितलं जातं. त्यानंतर एक कोड दिला जातो. जो त्याला WhatsApp मध्ये टाकावा लागतो. त्यामुळे ब्राऊजर हॅकर्सला अॅपमध्ये प्रवेश करण्यास मदत करते.त्यामुळे हॅकरला WhatsApp Web वर पूर्ण प्रवेश मिळतो आणि तेथून ते सर्व माहिती चोरू शकतात.पण वापरकर्त्याला याची कल्पनाही येत नाही की त्याचा WhatsApp हॅक झाला आहे.

नक्की वाचा >> Video: "लग्नानंतरही पासवर्ड..", बेडरूम उघडलं नाही, नवीन घराचं बाथरूम पाहून Youtuber सौरव जोशीची पत्नी थक्क

वापरकर्त्यांनी काय काळजी घ्यावी?

  • WhatsApp च्या सेटिंग्जमध्ये जाऊन Linked Devices सेक्शन तपासा.
  • येथे कोणताही अनावश्यक सेशन असल्यास ते Remove करा.
  • अशा प्रकारच्या कोणत्याही लिंकला विचार न करता मंजुरी देऊ नका.