भाजप विरुद्ध भाई ठाकूर, नालासोपारात जोरदार राडा, भूमीपुजना वेळी काय झालं?

बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात जोरदार राडा झाला. विशेष म्हणजे यावेळी भाई ठाकूर तिथे उपस्थित होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
नालासोपारा:

नालासोपाऱ्यात भाजप विरूद्ध भाई ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे. नालासोपाऱ्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिलटल होत आहे. याचे भूमीपूजन होणार होते. यावरून बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात जोरदार राडा झाला. विशेष म्हणजे यावेळी भाई ठाकूर तिथे उपस्थित होते. पोलिस बंदोबस्त असतानाही हा प्रकार झाला. शेवटी दोन्ही गटांनी हॉस्पिटलचे भूमीपूजन केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नालासोपारा विरार हा भाग भाई ठाकूर यांचा गड मानला जातो. या गडात आता भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाई ठाकूर यांच्या बविआ समोर भाजपने आव्हान उभे केले आहे. विधानसभा निवडणुका आता तोंडावर आहेत. अशात नालासोपाऱ्यामध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली जाणार आहे. त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्धाटनासाठी भाई ठाकूर आपल्या आमदारांसह पोहोचले होते. 

ट्रेंडिंग बातमी - मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, 'हा' आहे पर्यायी मार्ग

त्या आधीच तिथे भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भूमीपूजनाच्या ठिकाणी समोरा समोर आले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. भाजपचे कार्यकर्ते मोदी मोदीच्या घोषणा देत होते.तर बविआच्या कार्यकर्त्यांनी आप्पा आप्पाच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. त्यानंतर प्रकरण हातघाईवर आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत धक्काबूक्की झाली. 

ट्रेंडिंग बातमी - विधानपरिषदेला 12 वा उमेदवार देण्याची गरज नव्हती, विश्वजीत कदमांची रोखठोक भूमिका

पोलिसांनाही हा गोंधळ आटोक्यात आणणे अवघड होवून बसवे. भूमीपूजन आपण करणार असा दोन्ही गटाचा हट्ट होता. शेवटी कोणीही माघार घ्याला तयार नव्हते. अशा वेळी दोन्ही गटांनी एकाच हॉस्पिटलचे वेगवेगळे भूमीपूजन केले. त्यानंतर प्रकरण शांत झाले. या घटनेनंतर वसई, विरार आणि नालासोपारातले राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभा निवडणुकी पुर्वी झालेल्या या राड्यामुळे इथली लढाई संघर्षपूर्ण असणार याचीच झलक पाहायला मिळाली आहे. 

Advertisement