मोबाईलचं वेड! गाझियाबादच्या तीन बहिणींसारखं 'या' विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, कोणती गेम खेळायचा? पालक म्हणाले..

उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये ऑनलाईन गेमचं वेड लागलेल्या तीन बहि‍णींनी आयुष्य संपवलं. ही घटना ताजी असतानाच एका विद्यार्थ्यासोबत सर्वात भयंकर घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Online Gaming Shocking Incident

Online Game Shocking Incidents : उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये ऑनलाईन गेमचं वेड लागलेल्या तीन बहि‍णींनी आयुष्य संपवलं. ही घटना ताजी असतानाच मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सर्वात भयंकर घटना घडलीय. मोबाईल गेमच्या व्यसनामुळे एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ऑनलाईन गेममुळे विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास कसं प्रवृत्त केलं,असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, भोपाळ येथील एका विद्यार्थ्यानं मोबाईल गेमच्या व्यसनामुळं धक्कादायक पाऊल उचललं. जेव्हा त्याचे आई-वडील बाहेरगावी गेले होते. तेव्हा त्याने घरात गळफास घेऊन स्वत:चं जीवन संपवलं. पालक घरी आल्यावर त्यांना या दुख:द घटनेबाबत कळलं. अंश साहू असं या मुलाचं नाव आहे.

पोलीस उपायुक्त गौतम सोळंकी यांनी म्हटलंय की, अंशच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब कोसळलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला. याप्रकरणी पिपलानी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मात्र, अंशच्या खोलीतून पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन जप्त केला आहे.कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,अंश मोबाईलवर 'ब्लू व्हेल' गेम खेळायचा. गेममध्ये दिलेल्या कुठल्यातरी टास्कचे प्रेशर त्याच्यावर आले असावे आणि त्या दबावाखाली त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता त्याच्या कुटुंबियांनी वर्तवली आहे.अंशच्या आईने त्याला फोन वापरण्यासंबंधी समजही दिली होती.दरम्यान,आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नक्की वाचा >> "माझा शाप..", चॉकलेट न दिल्याने तृतीयपंथीयाने तरुणीसोबत केला विचित्र प्रकार, मेट्रो स्थानकातील व्हिडीओ व्हायरल

अंशच्या आजोबांच्या खात्यातून पैसे कट व्हायचे अन्..

विद्यार्थी अंशचे मामा भोला साहू यांनी सांगितले की, अंशच्या आजोबांच्या खात्यातून फ्री फायर गेमसाठी 28 हजार रुपये कट झाले होते. याच कारणामुळे कुटुंबाने एक महिन्यापूर्वीच त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला होता. त्याला मोबाईल न वापरण्यास सांगण्यात आलं होतं. ज्या दिवशी अंशने टोकाचं पाऊल उचललं, त्या दिवशीही   फ्री फायर गेम खेळत होता.त्याला या गेमचे मोठे व्यसन लागले होते.या व्यसनामुळेच त्याचा बळी गेल्याचं त्याचे कुटुंबीय सांगतात.