प्रतिकात्मक फोटो
मुंबई:
दादरमधील बत्तीगुल झाली आहे. गेल्या अर्धा तासापासून लाईट गेली आहे. त्यामुळे दादरकरांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. नेमकी वीज कशामुळे गेली याचे कारण अस्पष्ट आहे. जवळपास पाऊण तासानंतर लाईट दादरमध्ये आली. गेल्या अनेक वर्षात इतक्या वेळी लाईट जाण्याची ही पहिलीच वेळ होती. नक्की काय झालं हे दादरकरांना समजलेच नाही. दादर हा मध्य मुंबईचा भाग समजला जातो. शिवाय या भागात अनेक सेलिब्रेटी आणि मोठे नेतेही राहातात. व्हीआयपी भाग म्हणून याकडे पाहीले जाते. दरम्यान ही लाईट कशामुळे गेली होती हे स्पष्ट झाले नाही.