BMC Diwali Bonus: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने 'मोठी' ठरणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज, (गुरुवार 16 ऑक्टोबर 2025 ) रोजी दीपावली 2025 निमित्त कर्मचाऱ्यांसाठी भरघोस बोनस जाहीर केला आहे.
महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तब्बल 31,000 रुपये बोनस मिळणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या कर्मचाऱ्यांसाठी 31,000 रुपये बोनस
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घोषित केलेल्या तपशीलानुसार खालील श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी 31,000 रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस देण्यात येणार आहे.
- महानगरपालिका अधिकारी / कर्मचारीअनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी
- महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक
- माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित)
- माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित)
- अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित)
- अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित)
( नक्की वाचा : Big News: मोठी बातमी! गुजरातमध्ये भाजपाचं 'धक्कातंत्र'; मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त सर्व मंत्र्यांचा राजीनामा )
इतर कर्मचाऱ्यांसाठी भाऊबीज भेट
काही विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदानाऐवजी 'भाऊबीज भेट' जाहीर करण्यात आली आहे, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): 14,000 रुपये भाऊबीज भेट
बालवाडी शिक्षिका / मदतनीस: 5,000 रुपये भाऊबीज भेट