Remo D'Souza : बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

ओमप्रकाश चौहान या ग्रुपचा व्यवस्थापक होता. “V.Unbeatable dance group" मधील तरुणांनी एका प्रसिद्ध टीव्ही चॅनेलवर स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर अमेरिकेतील ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ या स्पर्धेत त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला होता. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर

भाईदरमधील प्रसिद्ध ‘V Unbeatable dance group" मधील तरुणांची 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बॉलिवूड मधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजा, त्याची पत्नी लिझेल डिसोजा यांच्यासह ग्रुपचा व्यवस्थापक अशा 7 जणांविरोधात मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भाईंदरमधील तरुणांनी एकत्र येऊन ‘वी अनबिटेबल' हा डान्स ग्रुप तयार केला होता. विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांमधून मिळणारे मानधन, बक्षिसांची रक्कम, सिनेमासाठी मिळालेले पैसे आदींचा अपहार करण्यात आल्याचा आरोप या ग्रुपमधील तरुणांनी केला आहे. 

(नक्की वाचा-  Kalyan News : सुट्ट्या पैशांवरुन वाद; तरुणाची महिला क्लार्कला मारहाण, फेरीवाल्यांचाही गोंधळ)

ओमप्रकाश चौहान या ग्रुपचा व्यवस्थापक होता. “V.Unbeatable dance group" मधील तरुणांनी एका प्रसिद्ध टीव्ही चॅनेलवर स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर अमेरिकेतील ‘अमेरिका गॉट टॅलेंट' या स्पर्धेत त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला होता. 

(नक्की वाचा-  तीन मित्रांना पत्नीच्या बेडरूममध्ये पाठवलं अन्..., पुण्यातील उच्चशिक्षित कुटुंबातील लज्जास्पद घटना)

विषेश म्हणजे या तरुणांनी या फसवणूक प्रकरणी नवघर पोलीस, मिरारोड पोलीस यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु गुन्हा दाखल न झाल्याने या मुलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

'NDTV मराठी' चं Youtube चॅनेल सब्सक्राईब करा )

कोण आहेत आरोपी?

आरोपींमध्ये रेमो डिसोजा एण्टरटेनमेंट कंपनीचे संचालक आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजा, त्यांची पत्नी लिझेल डिसोजा, डान्स ग्रुपचा व्यवस्थापक ओमप्रकाश चौहान, नवघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी विनोद राऊत, रमेश गुप्ता, रोहित जाधव आणि फेम प्रॉडक्शन कंपनी अशा 7 जणांचा समावेश आहे. या सर्व आरोपींनी आपसात संगणमत करुन डान्स ग्रुपमधील मुलांच्या कमी वयाचा व अल्प शिक्षणाचा फायदा घेऊन मागील 6 वर्षात एकूण 11 कोटी 96 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Topics mentioned in this article