चंद्रकांत खैरे निवडणूक लढवणार? लोकसभेच्या पराभवानंतर आता विधानसभेची तयारी

लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमधून पराभव झाल्यानंतर चंद्रकांत खैरे आता संभाजीनगर पश्चिममधून निवडणूक (Vidhan Sabha Election) लढवण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
औरंगाबाद:

लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमधून पराभव झाल्यानंतर चंद्रकांत खैरे आता संभाजीनगर पश्चिममधून निवडणूक (Vidhan Sabha Election) लढवण्याची शक्यता आहे. शिवसेना फुटीनंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

Advertisement

उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यावर आपण नक्की विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे खैरे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट असून त्यांच्या विरोधात खैरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी याच मतदारसंघातून विधानसभा उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे नेते राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे या जागेवरून कोणामध्ये लढत होणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Advertisement

नक्की वाचा - अजित पवारांनंतर शिंदे -फडणवीस दिल्लीत, चर्चांना उधाण, मंत्रिमंडळ विस्तार रखडणार?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. तर देवेंद्र फडणवीस ही दिल्ली दौऱ्यावर आहे. शिंदे आणि फडणवीस एकाच वेळी दिल्लीत असल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहे. अनेक तर्ववितर्क लढवले जात आहे. या दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटप, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, शिवाय आगामी रणनितीवर चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जाते. काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेत आपल्याला 80 जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती. त्यानंतर शिंदेही दिल्लीत धाव घेत आहे. त्यांच्या मागामाग  फडणवीसही दिल्लीत पोहचत आहेत.   

Advertisement