Shocking news: 'दुबईत नोकरी हवी असेल तर धर्म बदल' युट्यूबवर लग्न अन् त्यानंतर सुरू झाला खतरनाक खेळ, शेवटी...

या शिक्षिकेवर वारंवार अत्याचार होत होते. शिवाय तिच्यावर धर्म बदलण्याचा दबाव ही टाकला जात होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhajinagar News: आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. नंतर लैंगिक शोषण केलं. त्यानंतर आर्थिक फसवणूक मग तर धर्म बदलण्याची अट या सर्व गोष्टींचा सामना करावा लागला एका  विवाहीत शिक्षिकेला. ही विवाहीत शिक्षिका 41 वर्षांची आहे. ज्यावेळी तिला आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आले त्यावेळी तिने पोलीसात धाव घेतली. त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना छत्रपती संभाजी नगरच्या कटकट गेट परिसरात घडली आहे. या घटनेनंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. शिवाय संतापही व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची कुणकुण लागताच आरोपी मात्र फरार झाला आहे. 

छत्रपती संभाजीनगरमधल्या एकाने या विवाहीत शिक्षिकेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तो तेवढ्यावरच थांबला नाही त्याने त्या विवाहीतेसोबत युट्यूबवर मंगलाष्टके लावून लग्नाचा बनाव ही केला. यामुळे विवाहीतेचा त्याने विश्वास संपादीत केला. पण त्याचा प्लॅन काही तरी वेगळाच होता. पुढे त्याने या विवाहीतेसोबत शरीरसंबंध ही ठेवले. तिचे लैंगिक शोषण ही केला. मग त्याने आपला रंगा दाखवायला सुरूवात केली. तो तुला नोकरीचे आमिष दाखवू लागला. तो म्हणाला की तुला दुबईत नोकरी पाहीजे असेल तर तू धर्म बदल. हा आरोपी कटकट गेट परिसरातच राहोतो. 

Advertisement

नक्की वाचा - Raigad News: रायगडावर तंबू ठोकले, रात्र काढली, शिवभक्तांची 353 व्या शिवराज्याभिषेकाची तयारी कशी? वाचा सविस्तर

या शिक्षिकेवर वारंवार अत्याचार होत होते. शिवाय तिच्यावर धर्म बदलण्याचा दबाव ही टाकला जात होता. आरोपीने या विवाहीतेचा केवळ शारीरिक आणि मानसिक छळच केला नाही, तर आर्थिक लूटही केली. दुबईला घेऊन जाण्याच्या आणि पासपोर्ट काढण्याच्या बहाण्याने त्याने महिलेकडून वेळोवेळी 3 लाख 41 हजार रुपये रोख उकळले आहेत. तसेच विश्वास संपादन करून 6 तोळे सोन्याचे दागिने घेऊन तो पसार झाला आहे. ​​हुसेन अबू सोयदान असे आरोपीचे नाव आहे. त्याने या महिलेची फसवणूक करून पोबारा केला आहे. आपली फसवणूक झाली आहे याची कल्पना महिलेला आल्यानंतर तिने तात्काळ त्याच्या विरोधात तक्रा दाखल केली आहे. 

नक्की वाचा - Trending News: पेट्रोल, डिझेल, गॅस संकटानंतर देशावर आता नवं संकट! यातून मार्ग कसा काढणार?

25 एप्रिलपासून आरोपीने या महिलेशी संपर्क ठेवण्यास टाळण्यास केली. तर 1 जूनपासून त्याचा मोबाईल बंद झाला होता. त्यामुळे संपर्काचे सर्व दरवाजे बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी सध्या फरार आहे. ​​हुसेन अबू सोयदान असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. राज्यात सध्या लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यातीलच हे प्रकरण असल्याचं बोललं जात आहे.