जयदीप आपटेला अटक की आत्मसमर्पण? मोठा खुलासा, बुधवारच्या रात्री कल्याणमध्ये काय झालं?

जयदीप आपटेला पोलीसांनी अटक केले आहे असे म्हटले असले तरी आपटे याच्या वकीलांनी मात्र वेगळाच दावा केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळला होता. या प्रकरणी पोलीसांना हवा असलेला शिल्पकार जयदीप आपटे हा फरार होता. त्याला कल्याणच्या डीसीपी स्कॉडने अखेर कल्याण इथून ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी अटक केले आहे असे म्हटले असले तरी या आपटे याच्या वकीलांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. आपटे याचे वकील गणेश सोहनी यांनी ही अटक नसल्याचे म्हटले आहे. तर आपटे याने स्वत: आत्मसमर्पण केल्याचा दावा त्याच्या वकीलाने केले आहे. त्यामुळे अटक की आत्मसमर्पण अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग पोलीस जयदीप आपटेला घेऊन सिंधुदुर्ग साठी रवाना झाले आहेत.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुतळा कोसळल्यानंतर चेतन पाटील याला कोल्हापूर इथून अटक करण्यात आली होती. मात्र हा पुतळा ज्याने बनवला तो जयदीप आपटे मात्र फरार झाला होता. तो पोलीसांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी पोलीसांनी सापळा रचला होता. जयदीप आपटे याला शोधण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी पाच पथक तयार केली होती. त्याच्या विरोधात  लूक आऊट नोटीस देखील काढण्यात आली होती. सिंधुदुर्ग पोलीस तसेच कल्याण पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर जयदीपला कल्याण डीसीपी स्कॉटने त्याच्या घरातूनच ताब्यात घेतले. 

ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी : शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक

जयदीप आपटे आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी येणार होता. याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. सचिन गुंजाळ यांनी सचिन आपटे याला अटक करण्यासाठी दोन पथकं तयार केली. एक पथक कल्याण रेल्वे स्थानकात होतं. तर दुसरं पथक आपटे याचा बिल्डिंग समोर तैनात करण्यात आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला डीसीपी ऑफिस मध्ये आणण्यात आलं. त्या ठिकाणी त्याची चौकशी डीसीपी सचिन गुंजाळ यांनी केली. नंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

ट्रेंडिंग बातमी - मोठा निर्णय! शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू,वस्तू,समाधीचे जतन होणार

त्यानंतर आपटेचे वकील गणेश सोवनी यांनी या प्रकरणात काय झालं याची माहिती माध्यमांना दिली आहे. जयदीप आपटे याला अटक झालेली नाही असा दावा त्याने केला. आपटे याने पोलीसां समोर समर्पण केले आहे असे ही त्यांनी सांगितले. पुतळा कोसळल्यानंतर घाणेरडे राजकारण सुरू झाले होते. पुतळा कोसळल्याच्या सर्व घटनेचा दोष जयदीप याच्या माथी मारला जात आहे. हा सर्व प्रकार पाहून आपटे याने आत्मसमर्पण केल्याचे सोवनी यांनी सांगितले. दरम्यान आपटे याला सिंधुदुर्ग पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 

Advertisement