'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या योजनेसाठीची लॉटरी काढण्याचे आता सिडकोने निश्चित केले आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर या योजनेची घोषणा करण्यात आली होती. जवळपास 26,000 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी जवळपास 1 लाख 60 हजार अर्ज आले होते. मात्र ज्या वेळी घरांच्या किंमती जाहीर झाल्यानंतर मात्र अनामत रक्कम भरणाऱ्यांची संख्या कमी होती. या योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 31 जानेवारी ही रक्कम भरण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर पुढे मुदतवाढ दिली जाईल अशी शक्यता होती. पण आता तसं न करता 'माझे पसंतीचे घर' यासाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय त्याची तारीख ही जाहीर करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजे 12 ऑक्टोबरला 2024 ला सिडकोने माझे पसंतीचे घर या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत 26,000 घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू) (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये ही घरं उपलब्ध आहेत. सर्वांना परवडतील अशा दरात ही घरं उपलब्ध करून देण्यात येतील असं सिडको तर्फे सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सुरूवातीला या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 26 हजार घरांसाठी तब्बल दिड लाखा पेक्षा जास्त अर्ज आले होते. वाढणारा प्रतिसाद पाहाता सिडकोनेही अर्ज भरण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. 26 डिसेंबरही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. तर अनामत रक्कम दाखल करण्याची 31 जानेवारी ही शेवटची तारीख होती.
आता सिडकोने अर्ज केलेल्या अर्जदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी सोशल माडियीवर एक याबाबत पोस्ट केली आहे. त्यात सर्व अर्जदारांचे मन:पूर्वक आभार ! तुमच्या उदंड प्रतिसादामुळे माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार झाला आहे. 15 फेब्रुवारी 2025 रोजी सोडत संकेस्थळावर प्रकाशित होणार आहे. अधिक माहितीसाठी https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट द्या. अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सिडकोची ही बहुप्रतिक्षित सोडत 15 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे हे स्पष्ट आहे.
दरम्यान सिडकोना घराच्या किंमती सुरूवातीला जाहीर केल्या नव्हत्या. मात्रनंतर त्या जाहीर करण्यात आल्या. सिडकोकडून सर्व सामान्यांना परवडणारी घरे अशी जाहीरात केली होती. मात्र ज्या वेळी किंमती जाहीर झाल्या त्यावेळी सर्व सामान्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. ज्याचे उत्पन्न जेमतेम पन्नास हजार महिना आहे त्या व्यक्तीसाठी 42 लाखांची घरं देवू केली. यावरून अर्जदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक अर्जदारांनी अनामत रक्कम भरण्याकडे पाठ फिरवली. तेवढ्याच किंमतीत खाजगी बिल्डर्सकडेही घरं मिळत आहे. शिवाय वेगवेगळ्या सुविधाही मिळत आहेत. अशा स्थिती सिडकोचं घर का घ्यायचं असा प्रश्नही सर्व सामान्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे 26,000 घरांसाठी आदल्या दिवशी पर्यंत 15,000 हजार लोकांनीच अनामत रक्कम भरली होती.
सिडकोच्या घरांच्या किमती
EWS म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक
तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
खारघर बस डेपो - 48. 3 लाख
बामणडोंगरी -31. 9 लाख
खारकोपर 2A, 2B -38.6 लाख
कळंबोली बस डेपो - 41.9 लाख
LIG अल्प उत्पन्न गट
पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख 46.4 लाख
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख
खारकोपर ईस्ट - 40.3 लाख
वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख