Crime News: दीरासोबत प्रेमसंबध, नवऱ्याचा अडथळा, इंस्टाग्रामवर रचला थरकाप उडवणार हत्येचा कट

करण बेशुद्ध असताना, त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकराला सांगितले की तिला थोडावेळ झोपायचे आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
नवी दिल्ली:

दिल्लीतील द्वारका येथे करण देव याच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले आहे. हे एक सुनियोजित हत्याकांड असल्याचे ही सिद्ध झाले आहे. पत्नीने आपल्या दिराच्या मदतीने पती करणची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करणच्या पत्नीने त्याला आधी झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. मात्र त्यानंतर ही करणचा मृत्यू झाला नाही. मग पुढे तिने प्रियकर असलेल्या आपल्या दिरासोबत  मिळून त्याला विजेचा शॉक दिला. अशा पद्धतीने त्याला ठार करण्यात आले. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला जो तिचा दिर आहे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने पतीला ठार  करण्याचा कट रचण्यात आला. विशेष म्हणजे याची संपूर्ण स्क्रीप्ट   इंस्टाग्राम चॅटवर रचली गेली. यामध्ये पत्नीने दिरासोबत मिळून पतीला संपवण्याचा कट रचला. हत्येपूर्वी समोर आलेले चॅट एखाद्या एखाद्या थ्रिलरपेक्षा कमी नाहीत. हत्येनंतर पत्नीने आपल्या सासरच्या मंडळींना बोलावून निरागसपणे सांगितले, 'करणचा मृत्यू झाला आहे. मात्र, करणचा धाकटा भाऊ कुणालला संशय आला. त्याने तिचे चॅट वाचले आणि पोलिसांना पुरावे दिले. हे चॅट करणच्या चुलत भावाच्या मोबाईलमध्ये सापडले होते. 

नक्की वाचा- NCP Crisis: 'राष्ट्रवादीच्या फुटीआधी भाजपशी चर्चा..', अजित पवार गटाची पहिल्यांदाच मोठी कबुली

इंस्टाग्राम चॅटमध्ये हत्येची पूर्ण स्क्रिप्ट
रात्री उशिरा आरोपी पत्नी आपल्या दिराशी चॅट करत होती. दिर दिला काही गोष्टी सांगतो. मी घराच्या गल्लीतच आहे. तु बोलवशील तेव्हा मी येतो. पतीला किती गोळ्या देवू असं ती विचारते. त्यानंतर दिर सांगतो सगळ्या गोळ्या एकदाच देवून टाक. त्यानंतर ती सर्व गोळ्या देते. पण त्यानंतरही पतीला काही होत नाही. त्यावर ती घाबरून त्याला विचारते आता काय करायचं? त्यावर तो शॉक देण्याचं तिला सांगतो. हे सर्व इंन्स्टा चॅटवर रचलं जात होतं. एकादा का तो बेशुद्ध झाला की त्यानंतर त्याला संपवण्याचा डाव होता.   

आणि मग येतो भयानक सल्ला
पण कहाणी इथेच थांबत नाही. गोळ्या दिल्यानंतरही करणच्या स्थितीत जास्त बदल न झाल्याने पत्नी चिंतेत येऊन लिहिते, "खूप हळू श्वास घेतोय, चिमटा काढला तर थोडा हलला." मग समोरून दिराचा आणखी एक भयानक सल्ला येतो. तो लिहितो, "तर मग शॉक फायनल करूया, वेळ पण निघून जातोय सगळा." शॉक म्हणजे विजेचा धक्का. इंस्टाग्राम चॅटवरून हे स्पष्ट होते की, दोघांनी मिळून 'शॉक देणे हाच आता शेवटचा उपाय आहे' असे ठरवले. पत्नी म्हणते, "तू ये, सोबत मिळून कदाचित देऊ शकू." दिर उत्तर देतो, "ठीक आहे येतो, हा उठला तर अडचण होईल असं ही ती दिराला सांगते. त्यानंतर जे घडले ते वेदनादायक आहे. दोघांनी मिळून करणला विजेचा धक्का देऊन ठार केले.

Advertisement

नक्की वाचा - Exclusive : अख्खं गाव रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात, छत्रपती संभाजीनगरच्या फारोळा गावात काय घडलं?

चॅटने उघड केले हत्येचे रहस्य
पोलिसांनी सांगितले की, करणची पत्नी आणि तिच्या दिराचे 'चॅट' मिळाले आहेत. ज्यात त्यांनी हत्येचा कट रचला होता. चॅटमधून हे स्पष्ट झाले की, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. ज्यामुळे त्यांनी करणची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला रात्रीच्या जेवणात 15 झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तो बेशुद्ध होण्याची वाट पाहिली. दोन्ही आरोपींनी गुगलवर झोपेच्या गोळ्यांनी होणाऱ्या मृत्यूबाबतही शोध घेतला होता असे ही समोर आले आहे.

करण बेशुद्ध असताना, त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकराला सांगितले की तिला थोडावेळ झोपायचे आहे. दोघांनी करणला विजेचा धक्काही दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान तिने तिच्या प्रियकर  दिरा बरोबर मिळून पतीची हत्या केल्याची कबुली दिली. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीने करवाचौथच्या एक दिवस आधी तिला मारलं होतं. शिवीगाळ केली होती, तसेच तो तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होता, ज्यामुळे तिला मानसिक आणि शारीरिक त्रास होत होता.

Advertisement

नक्की वाचा - Jalna News: भावा-भावाची भांडणं, लहान भावाने मोठ्याचा खून केला, कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

पत्नीने हत्येची कबुली दिली
पोलिसांनी सांगितले की, करणला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. मेडिको-लीगल केस (MLC) मध्ये मृत्यूचे कारण विजेचा धक्का असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बुधवारी करणचा धाकटा भाऊ कुणाल देव याने पोलिसांशी संपर्क साधून आपल्या भावाच्या मृत्यूच्या परिस्थितीवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी आता या प्रकरणात पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला ताब्यात घेतले आहे. चौकशीत पत्नीने हत्येची कबुली दिली आहे.