आंबा हा फळांचा राजा. उन्हाळ्याच्या हंगामात याला नेहमीच मागणी वाढते. गुढीपाडव्याच्या सणाला तर याचे विशेष असे महत्व आहे.त्यामुळेच राज्य कृषी पणन महामंडळ आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने पुणे शहरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे 24 वे वर्ष आहे. शहरातील मार्केट यार्ड, गांधी भवन कोथरूड, मगरपट्टा हडपसर आणि खराडी अशा चार ठिकाणी 150 हून अधिक स्टॉल्स हे लावले गेले आहेत. विशेष म्हणजे या आंबा बाजारात ग्राहकांची फसवणूक रोखली जाणार आहे. त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या महोत्सवात आंब्याच्या विविध जाती या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तरी ही कोकणातील देवगड हापूस विषयी अधिक उत्सुकता आहे. या आंब्याला जी आय टॅगिंग करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकाला ओरिजनल देवगड हापूस आंबा घरी घेवन जाता येणार आहे. शिवाय त्यांची या टॅगिंगमुळे फसवणूक ही होणार नाही. याकरिता पणन महामंडळाने जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री करण्यासाठी अशा प्रकारच्या आंबा महोत्सवाचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे, असे मत देवगडच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Suresh Dhas: बिष्णोईचा 'धस'का! सुरेश धस यांच्या जीवाला धोका? बीडमध्ये नवा ट्वीस्ट
जी आय टॅगिंग केलेल्या आंब्याच्या बाबत देशांतर्गत व्यापार विकासचे व्यवस्थापक सुहास काळे यांनी जी आय टॅगद्वारे आपल्याला आंबा हा कोणत्या शेतकऱ्याचा आहे. तो देवगड हापूस आहे की नाही. याची पूर्ण माहिती या टॅगवरून मिळणार आहे. आता यात कर्नाटकी आंबा असेल अथवा इतर काही जातीच्या नावाखाली देवगड हापूस म्हणून आंबा विकला जात असेल तर त्याला पायबंद लागण्यास मदत होईल असं काळे यांनी स्पष्ट केलं आहे.
आता याबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण होण तितकच गरजेचं आहे.आता बाजारात आंबे विकताना मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. त्यातच आंब्याचे भाव देखील हंगामाच्या सुरुवातीला गगनाला भिडलेले दिसतात. यात ग्राहकांची होणारी फसवणूक ही थांबविणे गरजेचे आहे. त्यासोबत अशाप्रकारे जी आय टॅगिंग केल्याने येत्या काळात आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे. आता ह्याबाबत आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांना काय अनुभव येतो हे पाहणं महत्वाचे ठरेल.