पुण्यात पोर्शे कारच्या अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आहे. या अपघातात दोन निष्पाप तरूण आणि तरूणीला जीव गमवावा लागला होता. अपघाता पुर्वी पोर्शे कार चालवणाऱ्या अल्वपयीन तरूणाने पबमध्ये जाऊन दारूचे सेवन केल्याची चर्चा आहे. अल्पवयीन असतानाही त्यांना दारू दिली गेली हीबाब समोर आली आहे. या प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुण्यातल्या दोन पबला थेट टाळे ठोकण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणेतील कोझी आणि ओक वुडदोन्ही हॉटेल परमिट रूम तसेच पबला टाळे ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी हे आदेश दिले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने हे दोन्ही पब बंद केले आहेत. पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाला जाग आला आहे. अशी टिका आता पुणेकर करत आहेत. त्यामुळेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पुण्यातील पब, परमिट रूम यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार सर्वच पब, परमिट रूम यांची झाडाझडती घेतली जात आहे.
हेही वाचा - कोर्टाच्या निर्णयाचा पोलिसांनाही धक्का, अल्पवयीन मुलाच्या जामीनावर गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
ही मोहीम सुरू करणाताना कोणत्याही परमिट रूम आणि पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य दिले जाणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली जात आहे. शिवाय कोणतेही परमिट रूम आणि पब हे रात्री दिडनंतर सुरू राहाणार नाहीत याचाही काळी घेतली जात आहे. महिला वेटर्स रात्री साडेनऊ नंतर काम करणार नाही हेही काटेकोर पणे पाळण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - देश हादरवणाऱ्या 6 अपघात प्रकरणांतील आरोपींचे काय झाले?
ही दुर्घटना होण्याआधी पुण्यात पब, परमिट रूम हे सर्व नियम धाब्यावर बसवत होते असे आरोप होत आहे. पहाटेपर्यंत पब आणि परमिट रूममध्ये दारू दिली जात होती. त्यावेळी प्रशासन हे झोपा काढत होते असाही आरोप झाला आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जागा आली आहे. त्यानंतर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. जर प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष दिले असते तर ही दुर्घटना टाळता आली असती.