शाब्बास! दोन हात नाहीत, पायाने पेपर सोडवला, 12वी परीक्षेत मिळवलं मोठं यश

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात काहींच्या पदरी यश आलं आहे तर काहींच्या पदरी निराशा आली आहे. एकीकडे यशाची चर्चा सुरू असताना काहींचे यश मात्र इतरांच्या यशापेक्षा थोडं वेगळं ठरतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
लातूर:

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात काहींच्या पदरी यश आलं आहे तर काहींच्या पदरी निराशा आली आहे. एकीकडे यशाची चर्चा सुरू असताना काहींचे यश मात्र इतरांच्या यशापेक्षा थोडं वेगळं ठरतं. त्यापैकीच एक आहे लातूरच्या  गौस शेख या विद्यार्थ्याचं यश. हा विद्यार्थी तसा खास आहे. याला दोन हात नाहीत. असा स्थितीत त्याने बारावीचे पेपर पायाने सोडवले. त्यात त्याला  78 टक्के गुण मिळाले आहेत. त्याच्या यशाचे सर्वच जण कौतूक करत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
     
गौस शेख हा बारावी सायन्सला होता. रेणापूर तालुक्यातील रेणुकादेवी मध्यामिक आश्रम शाळेचा तो विद्यार्थी आहे. त्याला दोनही हात नाहीत. अशा स्थितीत त्याने शिक्षण घेत होता. बारावीच्या परीक्षेत त्याला पेपर लिहीण्यासाठी सहकारी मिळाला असता. पण त्याने स्वत: पेपर लिहीण्याचा निर्णय घेतला. त्याने आपले सर्व पेपर्स पायाने लिहीले. दिव्यांग असलेल्या लातूरच्या गौसने बारावी सायन्समध्ये तब्बल 78 टक्के गुण मिळवले. त्याने घेतलेल्या महेनतीचे चिज झाले. गौस याने दहावीमध्ये सुध्दा  89 टक्के गुण मिळवले होते. शिवाय शाळेत तो पहिला आला होता. गौसला सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने पुढच्या काळात तो वाटचाल करणार आहे.  

Advertisement

हेही वाचा - संभाजीनगरच्या लेकीनं बारावीत मिळवले 100 टक्के मार्क्स, 'शंभर नंबरी' यशाचं काय आहे रहस्य?

यावर्षी बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 97.51 टक्के निकाल लागलाय. तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 91.95 टक्के निकाल आहे.  यंदा 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. 

Advertisement

Advertisement