Dombivli News: डोंबिवलीत खेळताना चिमुरड्यावर काळाचा घाला! इलेक्ट्रिक फिडरला स्पर्श झाल्याने मृत्यू

Dombivli News: डोंबिवली पूर्वेकडील जिजाईनगरमध्ये विजेचा धक्का लागून 7 वर्षांच्या कृष्णा यादवचा मृत्यू झाला. बॉल काढण्यासाठी फिडर पिलर जवळ गेला असता हा अपघात घडला.

जाहिरात
Read Time: 2 mins

डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी, जिजाईनगर परिसरात एका निष्पाप चिमुरड्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. कृष्णा संजय यादव (वय 7 वर्ष) असे या मृत मुलाचे नाव आहे. आपल्या मुलाचा डोळ्यादेखत झालेला असा अंत पाहून यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खेळताना घडली दुर्दैवी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णाचे वडील संजय यादव हे टेम्पो चालक असून ते विठ्ठल कृपा बिल्डिंगमध्ये राहतात. शालेय सुट्टी असल्याने कृष्णा इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत आपल्या मित्रांसोबत बॉल खेळत होता. खेळता खेळता कृष्णाचा बॉल यमुना अर्जुन सोसायटीसमोरील कोपऱ्यावर असलेल्या महावितरणच्या इले(नक्की वाचा-  Political News: छत्रपती संभाजीनगरमध्ये 'महा-ट्विस्ट'! ZP मध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार?)क्ट्रिक फिडर पिलर (DP) जवळ गेला. बॉल काढण्यासाठी गेलेल्या कृष्णाचा हात नकळत फिडर पिलरला लागला. विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की कृष्णा तिथेच पिलरला चिकटून बेशुद्ध पडला.

Advertisement

उपचारापूर्वीच मृत्यू

कृष्णाला पिलरला चिकटलेले पाहून परिसरातील रहिवाशांनी तातडीने धाव घेत त्याला बाजूला केले. त्याला तातडीने स्टार कॉलनीतील 'एसीई' (ACE) हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथील डॉ. मुकेश केणे यांनी तपासून मृत घोषित केले. महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला.

(नक्की वाचा-  'Dhurandhar' Trailer: धुरंधर सिनेमातील 'या' कलाकाराची वाढली डोकेदुखी; रोज मिळत आहेत धमक्या)

पोलीस तपास आणि पालकांची प्रतिक्रिया

या संदर्भात टिळकनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली आहे. कृष्णाचे वडील संजय यादव यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे की, आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत त्यांना कोणावरही संशय किंवा तक्रार नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरातील उघड्या विजेच्या खांबांबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Topics mentioned in this article