शेतकऱ्याची भन्नाट आयडिया! कोंबड्यांसाठी थेट लावला एसी

पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या दगावल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांपासून होत आहेत. मात्र नाशिकच्या ग्रामीण भागातील एका तरुण शेतकऱ्याने यावर एक अनोखी शक्कल लढवली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

प्रांजल कुलकर्णी 

उष्णतेची तीव्रता वाढल्याने म्हणा किंवा अवकाळी पावसामुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या दगावल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांपासून होत आहेत. मात्र नाशिकच्या ग्रामीण भागातील एका तरुण शेतकऱ्याने यावर एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्याने चक्क हायटेक असा एअर कंडिशनर पोल्ट्री फार्म तयार केला आहे. शंभर दोनशे नाही तर तब्बल 22 हजार कोंबडयांचा तो सांभाळ करतोय. खाद्य पुरवणे, तापमान नियंत्रित करणे, लाईट्स आणि इतर सर्व कामे कंट्रोल रूम मधून एका कमांडवर केली जातात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राकेश गांगुर्डे याने हे एसी पोल्ट्री फार्ट तयार केले आहे. काही वर्षांपूर्वी ओपन पोल्ट्री फार्ममध्ये त्याने व्यवसाय सुरू केला होता. पण त्यात त्याला एवढे उत्पन्न मिळत नव्हते. बदलत्या वातावरणाचा देखील खूप मोठा फटका बसायचा. त्यासाठी शेड टाकली. कोंबड्यांसाठी सावलीही केली. पाण्याची व्यवस्थाही केली. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही.  त्यानंतर काहीतरी नवीन प्रयोग करायचे त्याने ठरवले. त्यात त्याने यू ट्यूबवर एसी फार्म हाउस बघीतले. त्याने प्रभावीत होऊन तसेच फार्म हाऊस तयार करण्याचे त्याने ठरवले. आणि तसे त्याने बनवलेही. त्याच्या दोन फार्ममध्ये 22 हजार कोंबडया सध्या आहेत. यातून जवळपास दीड लाखांचे उत्पन्न त्याला मिळत आहे. 

हेही वाचा - मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी बरसणार?

या एसी पोल्ट्रीसाठी त्याने एक कंट्रोल रूमही तयार केला आहे. तिथून पक्षांना खाद्य पुरवणे, तापमान नियंत्रित करणे, लाईट्स आणि इतर सर्व कामे एका कमांडवर केली जातात. विशेष म्हणजे कोंबड्यांना हवे असलेले तापमान इथे ठेवले जाते. शिवाय कमी जास्त करण्याची सुविधाही आहे. इथे मनुष्य बळाची गरजच लागत नाही. गांगुर्डे हे पत्नी आणि मुलांसह बावीस हजार कोंबड्यांची देशभाल यात करत आहेत. आनंद एग्रो कंपनीसोबत या शेतकऱ्याने करार केला आहे. त्यानुसार त्यांना कोंबड्या पुरवल्या जाताता. त्यानंतर कारारा नुसार या कोंबड्या मार्केटमध्ये दिल्या जातात. त्याला मिळणार भावही चांगला आहे. 

Advertisement