कोयना भागातील शिवसागर जलाशय किनारी वसलेल्या गावातील लोकांच्या दळणवळणाचे मुख्य साधन हे तराफा आहे. हीच तराफा सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. याचा फटका तापोळा, कोयना, कांदाटी खोऱ्यातील लोकांना बसणार आहे. सर्विस लॉन्च सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्याची माहिती लाँच सुपरवायझर यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने लॉन्च सेवा गेल्या अनेक वर्षापासून या भागात पुरवली जात आहे. तापोळा ते गाढवली, तापोळा ते केळघर तर्फ सोळशी यादरम्यान तराफा सेवा सुरू असते. कांदाटी खोऱ्यातील १६ गावांसाठी तर कोयना भागातील काही गावांसाठी सर्व्हिस लाँच सेवा सुरू असते. मात्र, कोयना धरण शिवसागर जलाशयाची पाणी पातळी पूर्णपणे खालावली असल्याने तराफा सेवेसह सर्व्हिस लाँच सेवाही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'पोर्शे कारनं ज्याने दोघांना चिरडलं, त्यालाच बर्गर-पिझ्झा दिला'
पाऊस सुरू झाल्यानंतर ज्यावेळी शिवसागर जलाशयाची पाणी पातळी पूर्ववत होईल, त्यावेळी वरिष्ठांच्या सूचनेनुसार ही सेवा पूर्ववत सुरू होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जो पर्यंत पाण्याची पातळी पुर्ववत होत नाही तो पर्यंत तराफा सेवा सुरू होण्याची वाट इथल्या नागरीकांना पाहावी लागणार आहे.