
GST Rate Cut Complain: केंद्र सरकारने जीएसटी (GST) दर कमी केल्यामुळे आज, 22 सप्टेंबरपासून अनेक रोजच्या वापरातील वस्तू स्वस्त झाल्या आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या असून, नवे दरही जाहीर केले आहेत. पण जर एखादा दुकानदार तुम्हाला नवीन किमतीने वस्तू देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. या संदर्भात सरकारकडून खास हेल्पलाईन नंबरही जाहीर करण्यात आला आहे.
अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या असून, नवीन दर जाहीर केले आहेत. त्यामुळे, तुम्ही आता कोणतीही वस्तू दुकानात खरेदी करताना नवीन किमतीनुसार ती घेऊ शकता. मात्र, जर एखादा दुकानदार तुम्हाला नवीन किमतीने वस्तू देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. दुकानदारची तक्रार कुठे आणि कशी करायची, ते जाणून घेऊया.
जुन्या स्टॉकवरही नवीन जीएसटी लागू आहे का?
एखादा दुकानदार जुना स्टॉक असल्याचं कारण देऊन, त्यावर जास्त एमआरपी (MRP) असल्याचं सांगून तुम्हाला नवीन किमतीने वस्तू देत नसेल, तर तो चुकीचा आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की जुन्या स्टॉकवरही जीएसटीचे नवीन दर लागू होतील आणि तो माल नवीन किमतीनुसारच विकला जाईल. त्यामुळे, सर्व दुकानदारांना ज्या रोजच्या वस्तूंची जीएसटी कमी झाली आहे, त्या नवीन दरांनुसारच विकाव्या लागतील.
( नक्की वाचा : New GST Rates: आता विमा पॉलिसीवर 0% जीएसटी; ‘या' तारखेपासून घेतला तरच होईल फायदा, जाणून घ्या सर्वकाही )
दुकानदारांची तक्रार कुठे करायची?
एखादा दुकानदार तुम्हाला जीएसटी कपातीचा फायदा देत नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही त्याची
कोणताही दुकानदार तुम्हाला जीएसटी कपातीचा फायदा देत नसेल, तर तुम्ही काही हेल्पलाइन नंबरवर कॉल करून त्याची तक्रार करू शकता.
तुम्ही नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइन नंबर 1800-11-4000 वर कॉल करू शकता.
तुम्ही सीबीआयसीच्या (CBIC) जीएसटी हेल्पलाइन नंबर 1800-1200-232 वरही कॉल करू शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world