सावकाराच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने पत्नी आणि 9 वर्षीय मुलाची हत्या करत स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. पुण्याच्या चिखलीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
शुभांगी हांडे (36 वर्ष) आणि धनराज (9 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर वैभव हांडे बचावले आहेत. पोलिसांनी या मृत्यूप्रकरणी संतोष कदम, सुरेखा कदम, संतोष पवार आणि जावेद खान या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
वैभव हांडेंनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, आधी पत्नी शुभांगी आणि मुलगा धनराज यांना सकाळी झोपेच्या अनेक गोळ्या दिल्या. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वैभव यांनी देखील फ्लॅटमधील पंख्याला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा - Saif Ali khan:'कुर्ता रक्ताने माखलेला, सोबत छोटा मुलगा', सैफ ज्या रिक्षात बसला त्या रिक्षाचालकानं सर्व थरार सांगितला)
त्याआधी शुक्रवारी रात्री वैभव यांनी मुंबईत नातेवाईकांकडे राहणाऱ्या आपल्या 14 वर्षांच्या मुलाच्या मोबाईलवर एक चिठ्ठी पाठवली होती. त्यात त्यांनी आपल्या आत्महत्येच्या प्लानविषयी सांगितलं. मुलाने सकाळी मेसेज वाचल्यानंतर तो घाबरला आणि त्याने आपल्या कुटुंबाची माहिती घेण्यासाठी शेजाऱ्यांना फोन केला. त्यानंतर शेजाऱ्यांनी देखील हांडे यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र वारंवार दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला त्यावळी असता वैभव जिवंत सापडला.
(नक्की वाचा- Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांच्या तावडीतून आरोपी पळाला ! जेलमध्ये नेत असताना धक्कादायक प्रकार)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडे यांनी आरोपी संतोष कदम आणि सुरेखा यांच्याकडून अनुक्रमे 6 लाख आणि 2 लाख रुपये मासिक 10 टक्के व्याजदराने घेतले होते. तर जावेद खानकडून जास्त व्याजाने 4 लाख रुपयेही घेतले होते. या सर्वांना मुद्दल आणि अतिरिक्त 9 लाख रुपये परत केले आहेत. तरीही ते अधिक पैसे देण्यासाठी त्रास देत होते. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे.
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |