Mumbai Local : मध्य रेल्वेचा मोठा दिलासा! दोन नवी स्टेशन आणि 20 अतिरिक्त लोकल लवकरच सेवेत, वाचा संपूर्ण प्लॅन

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेचे दोन नवे स्टेशन लवकरच सुरु होणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Local Train : मुंबईतील लाखो रेल्वे प्रवाशांना या प्लॅनचा फायदा होणार आहे.
मुंबई:

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेचे दोन नवे स्टेशन लवकरच सुरु होणार आहेत. हार्बर रेल्वेवरील  नेरूळ-उरण मार्गावर हे स्टेशन सुरु होणार आहेत. मध्य रेल्वेने (Central Railway) या दोन स्टेशनच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आणली असून, त्यासोबतच 20 अतिरिक्त लोकल ट्रेन्स चालवण्याचीही घोषणा केली आहे. यामुळे मार्गावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.

कोणती नवी स्टेशन सुरु होणार?

हार्बर रेल्वेच्या नेरुळ-ऊरण या मार्गावर तारघर (Targhar) आणि गव्हाण (Gavan) ही दोन नवीन रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची सोय आणि कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

नेरूळ-उरण मार्गावर सध्या 11 स्टेशन आहेत. या मार्गावरील तारघर आणि गव्हाण या दोन स्टेशनचे बांधकाम सुमारे 90% पूर्ण झाले आहे. ही दोन्ही स्टेशन लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. 'वन इंडिया' नं याबाबतचं वृत्त दिलंय. 

(नक्की वाचा : Thane-CSMT Metro: ठाण्याहून थेट CSMT मेट्रोनं गाठा; घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार, 21 लाख प्रवाशांना दिलासा )
 

तारघर स्टेशन (Targhar Station)

हे स्टेशन बेलापूर आणि बामणडोंगरी या स्टेशनच्यामध्ये असेल. हे स्टेशन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) सर्वात जवळ असल्यामुळे या स्टेशनला विशेष महत्त्व आहे. विमानतळ सुरू झाल्यावर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून येणाऱ्या प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटीमुळे मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

गव्हाण स्टेशन (Gavan Station):

हे स्टेशन खारकोपर आणि शेमातीखार यांच्यामध्ये बांधले जात आहे. गव्हाण तसंच तारघर या दोन्ही स्टेशनमुळे स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि या परिसरातील नागरिकांचा लोकल प्रवास सोपा होईल. त्यांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणावर वाचेल.

नेरूळ-उरण मार्गावरील  सर्व स्टेशन 

हार्बर मार्गावर खारकोपर ते उरण पर्यंतचा मार्ग आधीच सुरू झाला आहे. तारघर आणि गव्हाण ही नवी स्टेशन सेवेत आल्यानंतर या मार्गावरील सर्व 11 स्टेशन कार्यान्वित होतील. यात खालील स्टेशनचा समावेश आहे

Advertisement

नेरुळ, सीवूड-दारावे, सागरसंगम, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, न्हावाशेवा, रंजनपाडा, द्रोणागिरी आणि उरण.

( नक्की वाचा : Thane Metro ठाणे मेट्रोचा 'ऐतिहासिक' दिवस; 16,000 कोटींचा प्रकल्प 'ट्रॅक'वर, वाचा 13 लाख प्रवाशांना कसा फायदा )
 

20 अतिरिक्त ट्रेन्स लवकरच

प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे आणि दोन नवीन स्टेशन सुरू होत असल्याने, मध्य रेल्वेने या मार्गावर 20 अतिरिक्त लोकल ट्रेन्स चालवण्याची घोषणा केली आहे. या वाढीव सेवा ऑक्टोबर महिन्यात जाहीर होणाऱ्या नवीन वेळापत्रकात (New Time Table) समाविष्ट केल्या जातील, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर होईल.
 

Topics mentioned in this article